घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

त्या बुडालेल्या व्यक्तीचा तब्बल 24 तासांनी सापडला मृत्यदेह


कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

images (60)
images (60)

घनसावंगी तालुक्यातील देविदहेगाव येथील लघू तलावात मासेमारी करीत असताना पाण्याचा अंदाज चुकल्याने सोमनाथ ठाकरे वय (४५) हा व्यक्ती तलावात बुडाल्याची दुर्दैवी घटना दि.१६ (शनिवार) रोजी घडली.दरम्यान महसूल विभाग व पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून रविवारी सायंकाळी चार च्या सुमारास मृत्यदेह सापडून बाहेर काढण्यात यश आले.

सविस्तर माहिती अशी की,घनसावंगी तालुक्यातील देविदेहेगाव येथील सोमनाथ भिमराव ठाकरे वय ४५ हे नेहमीप्रमाणे शनिवारी मासेमारी करण्यासाठी तलावात गेले होते.पाण्याचा अंदाज चुकल्याने ते पाण्यात बुडाले संदर्भित व्यक्ती तलावात मासेमारीला गेली परंतु बाहेर आली नसल्याचे लक्षात आल्यानंतर नागरीकांनी शोधाशोध केली परंतु आढळून आले नाहीत. दरम्यान शिवसेना गटनेते अनिरूद्ध शिंदे यांनी घनसावंगीचे पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना घटनेची सविस्तर माहिती दिली.नायब तहसीलदार संदीप मोरे,पोलीस उपनिरीक्षक युवराज टाकसाळ,मंडळ अधिकारी एस.देशपांडे, तलाठी विजय बोचूडे,यांनी घटनास्थळी भेट दिली.

परतूर नगरपरीषदेची अग्निशमन दलाची गाडी घटनेच्या ठिकाणी दाखल झाली. नगर परिषद कर्मचारी यांनी मोटार बोटीच्या साहाय्याने शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केले .दरम्यान सायंकाळी चार च्या सुमारास सोमनाथ ठाकरे यांचा मृत्यदेह सापडण्यात नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांना यश आले दरम्यान सायंकाळी सहा च्या सुमारास सोमनाथ ठाकरे यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले
ह्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!