महाराष्ट्र न्यूज

वीज कंत्राटी कामगाराचा प्रकाशगड मुख्यालयाला घेराव.

महावितरणचे व्यवस्थापीकीय संचालक विजय सिंघल यांनी नोव्हेंबर मध्ये बैठका घेण्याचे दिले अश्वासन.

images (60)
images (60)

बबनराव वाघ / उपसंपादक

वीज कंत्राटी कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघातर्फे बुधवारी ( दि . २० ) मुंबई येथील वांद्रे ( पूर्व ) वीज कंपनीचे मुख्यालय प्रकाशगड येथे लाक्षणिक आंदोलन करून कामगारांनी रोष व्यक्त केला . ऊर्जा विभाग व वीज कंपनी प्रशासनाच्या निषेधार्थ राज्यभरातून सुमारे ३ ते ४ हजार कंत्राटी कामगार आंदोलनात सहभागी झाले . कामगार एकजुटीचा विजय असो , हमारे मांगे पुरी करो , हवाला बोल, अशा घोषणा देऊन कर्मचाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला . दुपारनंतर महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी संघटनेशी चर्चा केली . वीज कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत नोव्हेंबरमध्ये बैठक घेण्यात येईल , असे आश्वासन सिंघल यांनी दिले .

महावितरण , महापारेषण व महानिर्मिती या
” वीज कंपन्यांमध्ये सुमारे ४० हजार वीज कंत्राटी कामगार लाईनमन , ऑपरेटर , लिपिक , शिपाई , कॉम्प्युटर ऑपरेटर , ड्रायव्हर , सुरक्षारक्षक , मीटर रीडर आदी पदांवर सुमारे १० ते २० वर्षांपासून कार्यरत आहेत . त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे , तर नोकरभरती प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घ्यावे ही वीज कंत्राटी कामगारांची मागणी आहे .

बुधवारच्या आंदोलनात ज्येष्ठ मार्गदर्शक व कंत्राटी कामगार संघाचे अण्णाजी देसाई , प्रदेशाध्यक्ष नीलेश खरात , कामगार महासंघाचे निवासी सचिव प्रशांत भांबुर्डेकर , शर्मिला पातीळ , भारतीय मजदूर संघाचे प्रदेशाध्यक्ष अनिल ढुमने , प्रदेश सरचिटणीस मोहन येनुरे , सुनील कांबळे , अमर लोहार यांच्यासह वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांचा सहभाग होता . अध्यक्ष निलेश खरात यांनी शासन व प्रशासनाद्वारे सकारात्मक तोडगा न निघाल्यास कंत्राटी कामगारांना पुढील काळात विविध जिल्हा व तालुका पातळीवर तीव्र आंदोलन करावे लागेल , असा इशारा दिला .

दुपारनंतर शिष्टमंडळ चर्चेसाठी प्रकाशगड कार्यालयात गेले . महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी नीलेश खरात , मुंबई अध्यक्ष सुनील कांबळे व अण्णाजी देसाई यांच्यासमवेत चर्चा केली . यावेळी कार्याध्यक्ष उमेश आणेराव , संघटन मंत्री राहुल बोडके , मुख्यालयातील प्रशांत भांबुर्डेकर उपस्थित होते . एचडीएफसी बँकेच्या मार्फत तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगारांचा ११ लाख रुपयांचा अपघात विमा करण्याचा करार झाला आहे . याबाबत तसेच दिवाळीपूर्वी वेतन देण्याबाबत सूचना दिल्या जातील . नोव्हेंबरमध्ये वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी बैठक घेण्यात येईल , असे आश्वासन विजय सिंघल यांनी दिले , त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन थांबविल्याचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघटनेचे केंद्रीय उपाध्यक्ष तात्यासाहेब सावंत यांनी सांगीतले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!