घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
घनसावंगी तालुक्यातील ह्या गावात लागल्या पात्र शेतकऱ्यांच्या याद्या
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यात अतिवृष्टीने माहे जून,जूलै, ऑगस्ट महिन्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या अनुदासास पात्र असलेल्या विरेगव्हाण, विरेगव्हाण तांडा(ता घनसावंगी) येथील २१३ शेतकऱ्यांच्या याद्या आज दि.(२१) गुरूवार रोजी ग्रामपंचायतीच्या फलकांवर याद्या चिकटविण्यात आल्या.पात्र यादीत नाव पाहण्यासाठी लाभार्थ्यांनी गर्दी केली होती.दरम्यान,काही शेतकऱ्यांच्या आक्षेप, हरकती,असतील तर दि.२३ तारीखेपर्यंत कार्यालयीन वेळेत तक्रार नोंदविण्याचे आवाहन जांबसमर्थ सजाचे तलाठी व्ही.एस.बोचूडे यांनी केले.यावेळी तलाठी व्हि.एस.बोचूडे,सहाय्यक उद्धव तांगडे,तुकाराम पवार, रावसाहेब राठोड,आसाराम राठोड,अचित पवार, उद्धव राठोड, रविंद्र राठोड, शिवाजी राठोड,बाळु पवार, योगेश राठोड, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.