घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
गोपाल राजुरकर यांची जालना जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती
कुंभारपिंपळगाव:राजाटाकळी(ता.घनसावंगी) येथील गोपाल राजुरकर यांची जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.नियुक्ती पत्र देताना पालकमंत्री राजेश टोपे व इतर पदाधिकारी दिसत आहे.
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील राजाटाकळी येथील रहिवासी मराठा समाजाचे नेते गोपाल शिवाजी राजुरकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जालना जिल्हा सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली.जिल्हाध्यक्ष कपिल आकात यांनी हि नियुक्ती केली.पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.या नियुक्ती बद्दल रविंद्र आर्दड, कल्याण आर्दड, महेंद्र पवार, भागवत सोळंके, गणेश आर्दड, संभाजी देशमुख, रघुनाथ तौर,सभापती भागवत रक्ताटे,बंन्शीधर शेळके, रमेश धांडगे,रामेश्वर लोया,सतिष होंडे यांच्यास अनेकांनी अभिनंदन केले.