घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीची चौकशी करण्याची मागणी
कुंभार पिंपळगाव/प्रतिनिधी
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील ग्रामपंचायतीत झालेल्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी महिला ग्रामपंचायत सदस्य सरस्वती माणिकराव राऊत यांनी आज (दि२६) मंगळवार रोजी गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदन म्हटले आहे की,कुंभार पिंपळगाव येथे मोठी ग्रामपंचायत असून परंतु ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांना विचारात घेत नसून मनमानी कारभार चालवित असल्याचा आरोप सदस्यांनी केला आहे.सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी चौदाव्या वित्त आयोगातून कोणकोणती कामे करण्यात आली.तसेच येथील शौचालयाचे अनूदान परस्पर हडप करून फसवणूक केल्याचे निवेदनात म्हटले आहे.ग्रामसभेत मासिक बैठक होत नसून सरपंच पदावर महिला असून सरपंच पुत्र कारभारात हस्तक्षेप करीत असल्याचे दिलेल्या निवेदनात शेवटी म्हटले आहे. या सर्व गैरकारभाराची गटविकास अधिकारी यांनी चौकशी करण्याची मागणी सदस्य सरस्वती माणिकराव राउत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.