अंबड तालुकाजालना जिल्हा

शहागड येथील बुलढाणा अर्बनच्या शाखेत दरोडा टाकणाऱ्या चोरट्यांचा पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गेवराई पोलिसांची महत्त्वाची मदत

 

images (60)
images (60)

न्यूज जालना/कुलदीप पवार

तोंडाला रूमाल बांधून आलेले दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण १ कोटीपेक्षा जास्त मुद्देमाल पळवून नेल्याची घटना अंबड तालुक्यातील शहागड येथील बुलढाणा अर्बनच्या पतसंस्थेत (दि.२८) गुरूवार रोजी घडली.हा सर्व प्रकारच सीसीटीव्हीत कैद झाला होता.या घटनेनंतर सर्वत्र खळबळ उडाली होती.दरम्यान पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पथकांची स्थापना करण्यात आली.गोंदी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित
कोट्यवधी रुपयांचा ऐवज लांबवणाऱ्या तीन बंदूकधारी दरोडेखोरांपैकी दोघांच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह गोंदी पोलिसांच्या पथकाला अखेर यश आले आहे. यात गेवराई पोलिसांचीही मदत मिळाली या दरोड्याच्या घटनेमुळे जिल्हा पोलिस प्रशासनासह राज्यातील पोलीस दल हादरून गेले होते.काल औरंगाबाद विभागाचे आयजी मालिकार्जुन प्रसन्ना यांनी शहागड येथे भेट देऊन घटनेची माहिती घेतली होती. यावेळी पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग आदींची उपस्थिती होती. दरोड्याचा अवघ्या २४ तासात छडा लावल्यामुळे जालना पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!