महाराष्ट्र न्यूज

पत्रकारांना टोल माफी दयावी राज्य पत्रकार संघाची नितीन गडकरी यांच्याकडे मागणी

images (60)
images (60)

नागपुर/ प्रतिनिधी .
भारत सरकारने राष्ट्रीय व राज्य महामार्गावर पत्रकार यांना टोल माफी दयावी यासाठी नागपुर येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने ना. नितीन गडकरी यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली.


यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे, पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष नितीन शिंदे, नागपूर पूर्व विदर्भ विभागीय सचिव शरद नागदेवे, नागपूर शहर अध्यक्ष प्रदीप शेंडे, अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे, पत्रकार आनंद शर्मा, निवास शिंदे हरिभाऊ फापाळे आदी उपस्थित होते.देशातील व महाराष्ट्र राज्यातील पत्रकार हे वार्तांकन करण्यासाठी फिरत असतात. पत्रकार हा जनता व सरकार यामधील दुवा म्हणून कार्य करीत असतात. पत्रकार यांना कुठल्याही प्रकारचे मानधन अथवा पगार नसतो. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा राज्यातील 36 जिल्हयात तसेच गोवा, दिल्ली, बेळगाव, गुजरात या राज्यात कार्यरत आहे.


तरी या पत्रकार यांना टोलमाफी मिळावी यासाठी आपणाकडे पूर्वीही मागणी करण्यात आली आहे आता
तरी पत्रकार यांना टोल माफी मिळावी अशी मागणी करण्यात आली


तसेच पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे निमंत्रण देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने ना. नितीन गडकरी यांचा साईबाबांची मूर्ती व शाल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!