मंठा तालुका

मंठा:अतिवृष्टीतील बाधित शेतक-यांना

४ कोंटी ७२ लाख नुकसान भरपाई मिळणार

images (60)
images (60)

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी , उस्वद व शिरपूर या सज्जातील १० गावांतील ६ हजार २८८ हेक्टरवरील नुकसानग्रस्त क्षेत्रातील ६ हजार ५९६ बाधीत शेतक-यांना ४ कोटीं ७२ लाख ७९ हजार ८३५ नुकसान भरपाई मिळणार आहे.

मंठा तालुक्यातील तळणी , उस्वद व शिरपूर यांसह आदवाडी, इंचा, कानडी ,कोकरंबा, टाकळखोपा, देवठाणा-उस्वद , वडगाव सरहद या गावांतील ६ हजार २७४ हेक्टरवरील जिरायत , ६ हेक्टरवरील बागायत व ८ हेक्टरवरील फळबाग शेतीचे मोठे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले होते. शासनाने पहिल्या टप्प्यांत ७५ टक्के अनुदानासाठी ४ कोटीं ७२ लाख ७९ हजार ८३५ नुकसान भरपाईसाठी मंठा तहसीलकडे अतिवृष्टी अनुदान अहवाल तळणीचे तलाठी नितीन चिंचोले यांनी २८ ऑक्टोबरला सादर केला आहे.

गाव निहाय नुकसान भरपाई …

तळणी १ हजार ५५२ हेक्टरवरील १ हजार ५७४ बाधित शेतक-यांना १ कोटीं १६ लाख ६८ हजार ९५० नुकसान भरपाई , देवठाणा-उस्वद १ हजार २५० हेक्टरवरील १ हजार ३०२ बाधित शेतक-यांना ९७ लाख ३ हजार ३५० नुकसान भरपाई , शिरपूर ९२९ हेक्टरवरील ९८९ बाधित शेतक-यांना ६९ लाख ७० हजार ४२५ नुकसान भरपाई , उस्वद ७६८ हेक्टरवरील ७९५ बाधित शेतक-यांना ५७ लाख ६६ हजार ३३५ नुकसान भरपाई , वडगाव सरहद ४२१ हेक्टरवरील ४६६ बाधित शेतक-यांना ३१ लाख ५४ हजार ४२५ नुकसान भरपाई , कानडी ३२७ हेक्टरवरील ३८४ बाधित शेतक-यांना २४ लाख ९१ हजार ८०० नुकसान भरपाई , आदवाडी २८८ हेक्टरवरील ३१९ बाधित शेतक-यांना २१ लाख ६४ हजार २७५ नुकसान भरपाई , कोकरंबा २७६ हेक्टरवरील २६६ बाधित शेतक-यांना २० लाख ७५ हजार ९२५ नुकसान भरपाई , टाकळखोपा २३७ हेक्टरवरील २५६ बाधित शेतक-यांना १७ लाख ९७ हजार ५२५ नुकसान भरपाई , इंचा १९५ हेक्टरवरील २४५ बाधित शेतक-यांना १४ लाख ८६ हजार ७८५ नुकसान भरपाई मिळणार आहे.

शेतक-यांकडून जिल्हाधिकाऱ्यांचे आभार …

अतिवृष्टीची जालना जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड यांनी प्रत्यक्ष शेतात चिखल तूडवित पाहणी केली होती. या प्रसंगी तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तळणीचे तलाठी नितीन चिंचोले, कृषी सहाय्यक विजय खोडके यांनी नुकसानग्रस्त क्षेत्रातील नुकसीनीचा अहवाल दाखल केला. अखेर बाधित शेतक-यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याने शेतक-यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे आभार मानले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!