घनसावंगी तालुकाजालना जिल्हा

शिवचरीत्र वाचाल तर छत्रपती राजे जन्माला येईल-ह.भ.प.गजानन महाराज सोळंके

कुंभार पिंपळगाव:येथे आयोजित अखंड हरीनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीच्या किर्तन सेवेत पुष्प गुंफताना ह.भ.प.गजानन महाराज सोळंके.

images (60)
images (60)

कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार

शिवचरीत्राची आज अत्यंत गरज असून ज्यांचा चारित्र्य श्रेष्ठ असतो त्यांच्यावर चरीत्र लिहिला जातो म्हणून शिवचरित्र वाचाल तर छत्रपती राजे जन्माला येतील.असे प्रतिपादन शिवचरीत्रकार ह.भ.प.गजानन महाराज सोळंके यांनी केले.ते आज कुंभार पिंपळगाव येथे आयोजित अखंड हरीनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीच्या किर्तन सेवेत बोलताना केले. पुष्प गुंफताना जगदगुरू संत तुकाराम महाराज यांचा

तुम्ही संत मायबाप कृपावंत ।
काय मी पतित कीर्ति वानूं ॥

अवतार तुम्हां धराया कारणें ।
उद्धराया जन जड जीव ॥

वाढावया सुख भक्ति भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबांचे !!

तुका म्हणे गुण चंदनाचे अंगीं
तैसे तुम्ही जगीं संतजन ॥

संत तुकाराम महाराज यांच्या या चार चरणाच्या अभंगावर निरूपण करताना शिवचरीत्रकार ह.भ.प.गजानन महाराज सोळंके म्हणाले की,जगदगुरू तुकाराम महाराज यांनी भूतलावर सहा अवतार घेतले आहे.जगदगुरू तुकाराम महाराजांनी संताना मायबाप म्हटले आहे.नऊ महिने पोटात वागवते ति माता असते आणि जन्माला कारणीभूत ठरतो तो बाप असतो.संत अवतार उद्धार करण्यासाठी घेत असतात. साधूचे रक्षण,दुर्जनांचा नाश,आणि धर्माची स्थापना, या तीन कामासाठी भगवतांचा अवतार असल्याचे ह. भ.प. गजानन महाराज सोळंके यांनी सांगितले. परंतु सहा काम घेवून संत अवतार घेवून येतात.ज्या मुलासाठी बाप रात्रंदिवस राब-राबतो तो मुलगा वडीलांचे श्राद्ध घालतील याची आज श्वासती नसल्याचे महाराजांनी सांगितले. भगवंत ही अवताराला येतात आणि संतही अवताराला येतात. सुख,भक्ती,भाव,धर्म,कुळाचार आणि विठोबाचे नाम हे सहा काम घेवून संत अवतार घेत असतात. देव,देश आणि धर्म या तीन गोष्टींचे निष्ठेने पालन करा.तुकाराम महाराजांच्या अपशब्दांना वेदांनी मान्यता दिली. कधी एकत्रित न येणारी दोन टोक म्हणजे आई आणि बाप.परंतु जगदगुरू तुकाराम महाराज यांनी संताला तुम्ही माझे आई आणि बाप असल्याचे म्हटले आहे. वारकरी संप्रदायात एकजूटता आहे.म्हणून परंपरा कायम टिकून असल्याचे महाराजांनी सांगितले. आई ही जगात सर्वश्रेष्ठ असते तर बाप हा संकटाच्या पाठीशी असतो.शिवचरीत्राची आज अत्यंत गरज आहे. ज्यांचा चारित्र्य श्रेष्ठ असतो त्यांच्यावर चरीत्र लिहीला जातो.आणि ज्या चित्राची पुजा करतात तो चित्र म्हणजे छत्रपती शिवाजी राजे यांचा आहे. शिवाजी महाराजांच्या चरीत्रावर आचार आणि विचार होणे काळाची गरज आहे.छत्रपती राजेनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी रयतेचे राज्य निर्माण केले.म्हणून आई वडीलांची सेवा करून धर्माचे पालन करावे असे ह.भ.प.गजानन महाराज सोळंके यांनी केले.या किर्तनासाठी परीसरातील भाविक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!