कुंभार पिंपळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकऱ्यांना अनुदान वाटप सुरू
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
खरिप हंगाम जुलै,ऑगस्ट,सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टी व पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे नुकसानपोटी शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.त्याअनुषंगाने येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कार्यक्षेत्रातील ३१ गावांपैकी सत्तावीस गावातील अनुदान वाटपाला (दि.६) शनिवार रोजी अरगडे गव्हाण या गावापासून अनुदान वाटपाला सुरूवात करण्यात आली आहे.शासनाने नुकताच जाहीर केलेल्या अनुदानाच्या पहिल्या टप्प्यात ७५ टक्के रक्कम वाटप करण्यात येणार आहे.तर उर्वरीत २५ टक्के रक्कम दुसऱ्या टप्प्यात वाटप केली जाणार आहे.अतिवृष्टीने कापुस, तुर,मुग आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून गेला. शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी रक्कम खात्यात जमा करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करु अशी घोषणा राज्य शासनाकडून करण्यात आली होती.परंंतु दिवाळी उलटून दोन दिवसांनी का होईना अनुदान प्राप्त झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
३१ पैकी २६ गावांचे अनुदान प्राप्त
कार्यक्षेत्रातील ३१ गावापैकी २६ गावांचे अनुदान प्राप्त झाले आहे.यात अरगडे गव्हाण येथील ४४५ शेतकऱ्यांना ४४ लाख ४५ हजार २८१,भेंडाळा येथील ७६९ शेतकऱ्यांना ६२ लाख ७७ हजार २००,भेंडाळा तांडा येथील ३०२ शेतकऱ्यांना २१ लाख ११ हजार ९६३,भादली येथील ४७९ शेतकऱ्यांना ३० लाख ८२ हजार ७८,घाणेगाव येथील ५८६ शेतकऱ्यांना ४७ लाख ४४ हजार १००,घोन्सी खुर्द येथील ४४६ शेतकऱ्यांना ३० लाख १९ हजार ४१३,घोन्सी बु.येथील २७४ शेतकऱ्यांना २१ लाख ४३ हजार ९४३,घोन्सी तांडा एक येथील १३९ शेतकऱ्यांना ११लाख ६४ हजार ५७५,घोन्सी तांडा दोन येथील ३५० शेतकऱ्यांना २६ लाख ५९ हजार ५२२,गुणानाईक तांडा येथील २०५ शेतकऱ्यांना १४ लाख १३ हजार ६२५, गुंज येथील १४८६ शेतकऱ्यांना १ कोटी २८ लाख ८ हजार ७५५,जांबसमर्थ येथील ११३६ शेतकऱ्यांना ८८ लाख २२ हजार १८९, कोठाळा येथील ६८२ शेतकऱ्यांना ५३ लाख २७ हजार २००,लिंबोणी येथील ७८० शेतकऱ्यांना ६६ लाख ४८ हजार ५४, मुर्ती येथील ११०० शेतकऱ्यांना ९१ लाख ५७ हजार ५३०,नागोबाची वाडी येथील ७१४ शेतकऱ्यांना ४१ लाख ३९ हजार ४१,पिंपरखेड येथील १४८४ शेतकऱ्यांना १ कोटी ८३ लाख ८ हजार ४३८,पाडुळी येथील ४७० शेतकऱ्यांना ३६ लाख ९० हजार ७८१,राजुरकर कोठा येथील ९१७ शेतकऱ्यांना ६५ लाख २८ हजार ६००,श्रीपत धामणगाव येथील ५६२ शेतकऱ्यांना ३८ लाख ५० हजार ३२१,साकळगाव येथील ३२५ शेतकऱ्यांना २४ लाख ४४ हजार ९३५,सिंदखेड येथील ७५७ शेतकऱ्यांना ६१ लाख ९८ हजार ६६, शिवणगाव येथील ५४३ शेतकऱ्यांना ३८ लाख ९९ हजार ७५६,उक्कडगाव येथील ६०७ शेतकऱ्यांना ३९ लाख ७९ हजार ३१२,विरेगव्हाण येथील १०६ शेतकऱ्यांना ६ लाख ८० हजार १४५,विरेगव्हाण तांडा येथील १७७ शेतकऱ्यांना १० लाख ६३ हजार ८३८ अशा एकुण पंधरा हजार ९११ शेतकऱ्यांना अकरा कोटी ९३ लाख पन्नास हजार ६६१ रूपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. तर उर्वरित कुंभार पिंपळगाव, राजाटाकळी,लिंबी,पाडुळी, या चार गावातील अनुदान अद्यापही प्राप्त झालेला नाही.
“येथील शाखेत इंग्रजी बाराखडीनुसार अनुदान वाटप होणार असून ज्या दिवशी ज्या गावांचे यादीप्रमाणे नाव आहे. त्याच दिवशी त्या गावातील शेतकऱ्यांचे पैसे खात्यात वर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे शाखेत नागरीकांनी विनाकारण गर्दी करु नयेत.
विजय कंटुले
शाखाधिकारी