होळकर घाटाच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकाची -अशोक पातोड
गंगाखेड होळकर घाट हे आपल्या संस्कृतीचे वैभव आहे .त्याच्या संवर्धनासाठी सर्वांनी पुढे यावे अस आवाहन होळकर साहित्य अभ्यास गटाचे प्रमुख अशोक पातोड यांनी गंगाखेड येथे आज बुधवारी केलं.
होळकर साहित्य अभ्यास गटाचे प्रमुख अशोक पातोड यांच्या नेतृत्वाखाली अभ्यास गटाने बुधवारी गंगाखेड येथील प्रसिद्ध अहिल्यादेवी होळकर यांनी बांधलेल्या होळकर घाटाची पाहणी केली.
राजमातेने बांधलेल्या होळकर घाटाचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी असून त्यासाठी समाजातील प्रत्येक कार्यकर्त्यांनी पुढे यावे असे आवाहनही त्यांनी केलं. यावेळी या गटातील प्रा सतीश अघडते, नितीन घाडगे, घटोळ सर उपस्थित होते. या अभ्यास गटाने घाट पाहणीनंतर संत जनाबाई चे दर्शन घेतले. यावेळी मंदिरात परभणी लोकसभा मतदार संघातील धनगर समाज बांधवांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार, तथा धनगर साम्राज्य सेनेचे संस्थापक सखाराम बोबडे पडेगावकर, मसनेरवाडी चे माजी सरपंच जयदेव मीसे पाटील, प्रसिद्ध भागवत कथा प्रवक्ते ह भ प शिवाजी महाराज बोबडे आदींची उपस्थिती होती.