तुला राम दिसला का….,
मी महाराष्ट्रातील पुणे शहरात राहते.माझा संपूर्ण कुटुंब सांप्रादायिक वारसा जपत आहेत.आम्ही सगळे मिळून सकाळ व संध्याकाळ श्रीराम प्रभूचा भजन करीत असतो .माझा छोटा नातू साधारण अडीच वर्षांचा आहे. आम्ही सगळे मिळून भगवत गीता वाचन करतो. बाल साहित्य पण आम्ही छोटे ईशानसाठी आणले आहे. एक दिवस तो आमच्या सोबत खेळताना माझ्या गळ्याततील पोत दाताने तोडली. आणि सोन्याचा मणी तोंडात दाताने चावु लागला. मी त्याला नाही मनु लागले तरीही तो ऐकत नव्हता.आणी शेवटी त्याची आई आली आणी मनु लागली. की ईशान तु असे का केले यावर तो मनाला हनुमानजी हे ऐकून मला काय बोलावे हे कळालेच नाही. त्याला म्हणाले की तुला राम दिसला का…, तो मनाला हो,लहान मुलांना संस्कार करण्याची गरजच पडत नाही. ते आपल्या परीवारांचे आनुकरण करीत असतात.
लेखिका
श्रीमती विजया लोंढे
कुंभार पिंपळगाव ता.घनसावंगी जिल्हा. जालना