एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ सोडवा अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करणार -महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
राज्यातील एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासनात विलीनीकरण करावे या मागणीसाठी मागील गेल्या 13-14 दिवसापासून राज्यभर बेमुदत संप सुरू आहे. या संपाचा सर्वसामान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आज सोमवार (14) रोजी मनसेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे..
तहसीलदार यांनी मार्फत दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, एसटी महामंडळाच्या वर्षानुवर्षे ही मागणी प्रलंबित आहेत.न्यायालयाच्या आदेशाने त्रिस्तरीय समितीची नेमणूक केली आहे.त्यामुळे जनतेला वेठीस धरू नका आंदोलन मागे घ्यावे अन्यथा कर्मचाऱ्यांचे निलंबन करू अशी चेतावणी परीवहन मंत्री कर्मचाऱ्यांना देत आहे.आतापर्यंत महाराष्ट्रातील 396 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.तसेच अनेकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.तुटपुंज्या पगारावर कर्मचारी रात्रदिवस राबतो जिवाची पर्वा न करता अखंड सेवा देण्यासाठी तत्पर राहतात.ते आपल्या हक्कासाठी लढत असताना त्यांच्यावर कारवाई करणे म्हणजे जुलमी राजवटीचा कळस आहे.असा आरोप निवेदनातून केला आहे. मनसेच्या वतीने एसटी कर्मचाऱ्यांना सर्वत्र पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा तातडीने विचार करून सोडवाव्यात अन्यथा मनसे स्टाईलने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष विष्णू माकोडे,गणेश आर्दड,गोरख पवार,विशाल सोनवणे,गोवर्धन ढेरे,गणेश भालेराव,प्रदीप उकांडे,विक्रम शेळके,दत्ता आर्दड,प्रदीप जाधव,उमेश मुंदडा,रविंद्र गोरे,क्रष्णा आर्दड,अभिषेक आर्दड,क्रष्णा माकोडे,नारायण ढेरे,रामेश्वर सातपुते,संतोष माकोडे, राम काळे,प्रवीण धर्माधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.