घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
श्रीपत धामणगाव येथे लसीकरण मोहिमेस प्रतिसाद
एकाच दिवशी तब्बल 105 जणांचे लसीकरण
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील श्रीपत धामणगाव येथे मिशन कवच कुंडल अंतर्गत तिसऱ्या टप्प्यात ऊसतोड कामगारांचे मोबाईल मेडिकल युनिट व्हेन मधुन आज दि.(16) मंगळवार रोजी तब्बल 105 नागरीकांना कोरोना लसीकरण करण्यात आले. यावेळी डॉ. गजानन सपाटे,औषध निर्माण अधिकारी चक्रधर उगले,आरोग्य सेविका करूणा लहाणे,प्रवीण श्रीसुंदर,चालक अशोक सपाटे, सिद्धेश्वर घोगरे,मोहसीन शेख,सरपंच दत्तात्रय शिंदे, यांच्यासह शिक्षक कर्मचारी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.