कुंभार पिंपळगाव व जांबसमर्थ येथील बँकेकडून निराधार लाभार्थांचे अनुदान जमा होईना !
लाभार्थांचे बँकेत हेलपाटे;वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
वंचित घटकातील निराधार लाभार्थांची दिवाळी गोड व्हावी यासाठी शासनाकडून निराधारांचे अनुदान जाहीर करण्यात आले होते.हे अनुदान तहसील कार्यालयाकडून वीस दिवसापूर्वीच बँकेकडे वर्ग करण्यात आले आहे.परंतु ही रक्कम बँक प्रशासनाकडून लाभार्थांच्या खात्यात जमा होत नसल्याने अनेकजण आर्थिक कोंडीत सापडलेले आहेत.घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील जिल्हा मध्यवर्ती बँक,बँक ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्र ग्रामीण बँक,व जांबसमर्थ येथील कॅनरा बँक या शाखेत अनेक निराधार लाभार्थी खातेदार आहेत.दरमहा निराधारांचे अनुदान या शाखेत जमा करण्यात येतो.येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून अनुदान वाटप करण्यात आले आहे.परंतु कुंभार पिंपळगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र, व जांबसमर्थ येथील कॅनरा बँक या बँकेत अनुदान जमा होऊनही अद्यापपर्यंत निराधार लाभार्थांच्या खात्यावर रक्कम जमा करण्यात आले नाही.या बँकेकडून निराधारांचे अनुदान वाटपाला प्रत्येकवेळेस दिरंगाई करण्यात येते.अनुदान वाटपास विलंब का केला जातो असा प्रश्न उपस्थित होत आहे. जेष्ठ,व अपंग लाभार्थी अनुदानासाठी बँकेत वारंवार चकरा मारीत असुन त्यांना रिकाम्या हाती माघारी परतावे लागत आहेत..बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून अनुदाना संबंधित जाब विचारल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत.वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन ही रक्कम तात्काळ खात्यात जमा करण्यात यावी अशी कुंभार पिंपळगावसह परीसरातील निराधार लाभार्थांनी केली आहे.
या बाबत घनसावंगीचे तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.
“निराधारांचे अनुदान दिवाळीपूर्वी बँकेत वर्ग करण्यात आले असुन शाखा व्यवस्थापकाशी चर्चा करून लवकरच खात्यात रक्कम जमा करण्यात येईल..
भागवतराव सोळंके
अध्यक्ष सं.गां.नि.समिती
“अनुदानाची मिळणारी रक्कम ही तुटपुंजी असुन ते जीवनाश्यक गरजा भागविण्यासाठी कामी येते.हे मानधन वेळवेर हातात पडत नसल्याने अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पारूबाई राठोड
लाभार्थी, विरेगव्हाण तांडा