आता स्वातंत्र्य संग्रामाचा दुसरा लढा सुरू झालाय – अशोक चव्हाण
मुंबई दि. १८ नोव्हेंबर, १०२१ :
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात स्वातंत्र्य सेनानीचे अमूल्य योगदान सर्वांना माहितच आहे. अनेक सेनानींनी
प्राणाची आहुती या स्वातंत्र्य संग्रामात दिली. त्यांचा घोर अपमान करे पर्यंत हा विषय पुढे गेला आहे. कोणीतरी मुद्दामच हे करतो आहे. त्यामुळे देशात
आता स्वातंत्र्य संग्रामाचा दुसरा लढा सुरू झाला असल्याचे मत माजी मुख्यमंत्री मंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी येथे व्यक्त केले.
काही लोक स्वातंत्र्य संग्रामाचा अपमानच नव्हे; तर पुरोग्रामी विचार ही गाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडून खोटा इतिहास लिहिण्याचा प्रयत्न सुरू आहे.
हा देश पुरोगामी विचारानेच चालणारा आहे. आपल्या तत्वांवर,विचारांवर ते हल्ला करीत आहेत. तेव्हा आपण आपल्या विचाराला जपले पाहिजे. आम्हा राजकारन्याना जे जमत नाही; ते कलाकारांना जमते. त्यांनी आपल्या कले द्वारे लोकांशी बोलले पाहिजे. सत्य सांगितले पाहिजे. आपल्या तत्वांची राखण करणारी नवी मांडणी करायला हवी; असे आवाहनही चव्हाण यांनी कलाकारांना केले. जे स्ववतंत्र्यचा
इतिहास बदलू पाहत आहेत. त्याच्या विरोधात स्वातंत्र्य संग्रामासारखीच मोठी चळवळ उभी करावी लागेल असेही चव्हाण म्हणाले.
लोकशाहीला , पुरोग्रामी विचाराना पूरक अशी नवीन पिढी आहे. मात्र त्याचा कसलेल्या सोनाराप्रमाणे शोध घ्यावा लागेल. अनिरुद्ध वनकर सारखी विचारांनी झपाटलेली कलाकार मंडळी विधानपरिषदेत आल्यावर सभागृहातील तापलेल्या वातावरणाची दिशाच बद्दणार आहे, अशा शब्दात त्यांनी अनिरुद्ध वनकर यांच्या कलेचे आणि कार्याचे
कौतुक केले.
चोकीदाराचा प्रश्न हा महागाई पुरता मर्यादित राहिलेला नाही. त्या प्रश्नांचा देश पातळीवर नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. पुरोगामी विचारांसाठी लढणाऱ्यांनी महागाई सारखे प्रश्न मर्यादित विचार न करता त्यातील दडलेले सत्य जनतेसमारो आणले पाहिजॆ. शाहीर- कलाकारांना यासाठी आग्रही असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले.
लोकजागृती संस्था चंद्रपूर अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या “घायाळ पाखरा आणि स्मशान पेटलं आहे” या नाटकाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा गुरवार दि. १८ नोव्हेंबर रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान मुंबई येथे माजी मुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राष्ट्रवादीचे नेते काका साहेब खंबाळकर, सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे, मुंबई विद्यापीठचे नाटयशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मंगेश बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.