एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघेना ;प्रवासांचे हाल मात्र सुरूच
जालना:अंबड आगारातील एसटी कर्मचाऱ्यांनी आगारात अशाप्रकारे ठिय्या आंदोलन ठामपणे सुरू आहे.
संपाचा आज १६ वा दिवस खाजगी वाहनधारक मालामाल
कुलदीप पवार/प्रतिनिधी
एसटी कर्मचाऱ्यांचे आज संपाला सोळा दिवस झाले तरीही संप सुरूच आहे.या संपाचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. महिला, जेष्ठ, अपंग प्रवाशींचे मात्र अधिक हाल होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.तर या संपाचा गैरफायदा खासगी वाहनधारक घेत आहे.तिकिटाच्या दरापेक्षा अधिक रक्कम घेवून आर्थिक लूट केली जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे,या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळीत संप पुकारला. हा संपाला शुक्रवारी सोळा दिवस उलटून गेले तरी संपावर तोडगा निघत नाहीत.कर्मचाऱ्यांकडून बसस्थानक, आगारात ठिकठिकाणी ठिय्या आंदोलन मांडत आहे. तसेच मुंडन,गोंधळ,निर्दशन,प्रार्थक,अर्धनग्न असे अनोखे आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधण्यात आले.तरीही अद्याप शासनाकडून याबाबत तोडगा काढलेला नाही. याचा त्रास सामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे.बसची चाके थांबल्याने खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे.हे वाहनधारक प्रवाशांकडून जास्तीचे पैसे घेवून आर्थिक लूट करत आहेत. अवैध खाजगी वाहतूकीवर प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.कर्मचाऱ्यांच्या संपावर लवकर तोडगा काढून हाल थांबवावेत अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.