देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था औरंगाबाद ची सहकार सप्ताह साजरा
न्यूज जालना दि.20:
देवगिरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद 68 वा सहकार सप्ताह निमित्त दि 19 शुक्रवार रोजी साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कचरूजी रायभानजी जाधव अध्यक्ष अँड योगेशजी जाधव,कार्यकारी अधिकारी संचालक कृष्णा आग्रे कार्यकारी अधिकारी संचालक आदिनाथ जाधव लेखापरीक्षक अधिकारी बाबुराव पवार कर्ज वसुली अधिकारी अनिल सुलताने यांच्यासह सभासद, खातेदार उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे कार्यकारी अधिकारी संचालक कृष्णा आग्रे यांनी कामकाजाची सविस्तर माहिती दिली. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. वेळेचे नियोजन स्व. भांडवलावर उभी असलेली संस्था महाराष्ट्रातिल अग्रगण्य संस्था,पीग्मीठेवीचे लाखो खाते असलेली भारतातील एकमेव संस्था ,व्यसनमुक्ती संस्था अध्यक्षाच्या भाषणामध्ये आपण आपल्या परिवार व्यसनमुक्त ठेऊन इतरांनाही व्यसनमुक्त ठेवण्यास प्रवृत्त करा सत्य बोला ,बचत करा ,नियोजन करा वरील सर्व बाबींचे आपल्या जीवनामध्ये पालन करावे असे संथापक अध्यक्ष यांनी सांगितले कोरोनाचे काटेकोर नियम पाळून कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.