इंदेवाडी येथे स्व.इंदिराजी गांधी यांची जयंती साजरी
जालना प्रतिनिधी
जालना तालुक्यातील इंदेवाडी येथे जालना जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने दिनांक १९ शुक्रवार रोजी येथे स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान भारतरत्न स्व .इंदिराजी गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली .
तसेच एक वर्षा पासून चालू असलेल्या शेतकरी आंदोलना आज यश मिळाले असुन शेतकर्याचा विजय झाला आहे.आज पंतप्रधान मोदी यांनी तीन काळे कायदे परत घेण्याची घोषणा केली.
या घोषणा नंतर इंदेवाडी येथे सेवादलाच्या वतीने मिठाई वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला .
यावेळी सेवादलाचे जिल्हा कार्याध्यक्ष अब्दुल रफीक सर ,जिल्हा समन्वयक बाबासाहेब सोनवणे , महिला जिल्हा अध्यक्ष चंदा ताई भागऺडीया ,कृषी समितीचे जिल्हा समन्वयक मनोहर उघडे,सर्जेराव शिंदे,गुलाबराव शिंदे ,माणिकराव कसारे,बाजीराव शिंदे, रमेश शिरसाट,बाबासाहेब गावडे,तुकाराम बोलधने,अशोक मोरे, विठ्ठल कसारे,विष्णू पटेकर, सुभाष गावंडे,प्रदीप शिंदे, विनायक काळे,शालिक काळे, भगवान काळे, लक्ष्मणराव बोलधने,गंगाधर शिंदे,महादु पगुडवाले,संतोष सर्जेराव शिंदे,नितीन शिंदे, दिपक शिंगारे,कार्तिक तांबडे, अशोक खरात, यांच्यासह अनेक शेतकरी बांधव व सेवादलाचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने सदरील कार्यक्रमास उपस्थित होते .