वीजबिलासाठी महावितरणने काढले हे नवे नियम….!
1 नोंव्हेंबर पासुन निर्णय लागू
मुंबई दि.22 :
महावितरणने वीजबिल भरण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सर्व वर्गवारीतील ग्राहकांना १ नोव्हेंबरपासून वीजबिल (Electricity Bill) रोखीने भरण्यासाठी दरमहा पाच हजार रुपयांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. मात्र वीजग्राहकांना केव्हाही व कुठूनही विनामर्यादा रकमेचे वीजबिल भरण्यासाठी महावितरणचे मोबाईल ॲप तसंच www.mahadiscom.in या संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध करुन दिली आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार महावितरणकडून वीजबिलांच्या भरण्याद्वारे रोखीने स्वीकारण्यात येणाऱ्या रकमेवर १ नोव्हेंबरपासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्याप्रमाणे ग्राहकांना वीजबिलांचा रोखीने भरणा करण्यासाठी यापुढे पाच हजार रुपयांची मर्यादा राहणार आहे. त्यापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल भरण्यासाठी ‘ऑनलाईन’ किंवा धनादेशाद्वारे देखील रक्कम स्वीकारली जाणार आहे. तसंच मुदतीनंतर धनादेश क्लीअर झाल्यास विलंब आकार शुल्क आणि कोणत्याही कारणास्तव धनादेश अनादरित झाल्यास प्रत्येक वीजबिलासाठी ७५० रुपये बँक प्रक्रिया शुल्क व त्यावरील १८ टक्के जीएसटी कराचे १३५ रुपये असे एकूण ८८५ रुपये ग्राहकांना भरावे लागणार आहेत.