जालन्यात चोरीचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक
न्यूज जालना प्रतिनिधी
जालना शहरातील गोल्डन ज्युबली शाळेच्या रस्त्यावर श्रीकांत विजयकुमार दाड (रा.शिक्षक कॉलनी नवा मोंढा) हे व्यापारी दुचाकीवरून जात असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांना रस्त्यावर अडवून डोळ्यात मिरची पावडर टाकून हातातील बॅग हिसकाविण्याचे प्रयत्न केले.हि घटना दि.26 ऑक्टोंबर रोजी घडली होती.
स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार हे जबरी चोरीच्या गुन्हांचे विश्लेषण करीत असताना खबऱ्यामार्फत अशी माहिती मिळाली होती की, गोल्डन ज्युबली शाळेच्या रस्त्यावर आरोपी नोव्हा नेल्सन वडागळे (रा.नुतन वसाहत जालना) व त्याच्या इतर साथीदारांनी मोटारसायकल अडवून चोरीचा करण्याचा प्रयत्न केला होता. अशी खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यावरून गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी आरोपी नोव्हा नेल्सन वडागळे (वय 21) जालना यांना पोलिसांनी ताब्यात घेवून विचारपूस केली.सदरचा गुन्हा व साथीदार सुहास रमेश पवार वय 21 (रा.वडगाव कोल्हारी,औरंगाबाद) हर्षवर्धन उर्फ बबलू-पांडुरंग भाले वय 23 (रा.मोहटादेवी मंदिर बजाज नगर औरंगाबाद) यांच्यासह चोरी केल्याची पोलिसांना कबुली दिली.सदरील तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस ठाणे सदर बाजार करीत आहेत.सदरची ही कामगिरी पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक श्रीकांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, प्रमोद बोंडले,पोलीस उपनिरीक्षक पोलिस सम्युअल कांबळे कृष्णा तंगे,सचिन चौधरी,सागर बाविस्कर, सुधीर वाघमारे, दत्ता वाघुंडे,फुलचंद गव्हाणे,यांनी हि कामगिरी केली आहे.