घनसावंगी तालुकाजालना जिल्हा
लालू राठोड यांची शालेय व्यवस्थापन अध्यक्षपदी निवड
कुंभार पिंपळगाव/कुलदीप पवार
घनसावंगी तालुक्यातील बंगलेवाडी तांडा येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेत पालक सभेचे आयोजन करुन शालेय व्यवस्थापन समिती आज दि. (२४) बुधवार रोजी गठित करण्यात आली.हि निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यात अध्यक्षपदी लालू पिका राठोड,तर उपाध्यक्ष पदी नानू भगवान चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.तर सदस्यपदी धर्मराज चव्हाण,ज्ञानेश्वर चव्हाण, संजय चव्हाण,बाळू चव्हाण,अनिल राठोड,संतोष राठोड,यांची निवड करण्यात आली.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक यु.जे.पवार,विद्या मुळे,यांच्यासह पालक शिवाजी शिंदे, रामराव राठोड, लक्ष्मण राठोड,परमेश्वर चव्हाण, नामदेव राठोड उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचा सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.