पैगंबर मोहम्मद बिल सह विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन
जालना प्रतिनिधी
पैगंबर मोहम्मद बिल पास करून घेण्यासाठी व विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले.
वंचित बहुजन आघाडीच्या प्रयत्नामुळे 5 जुलै 2021 रोजी विधान भवनावर मोर्चा काढून न्यायालयाने मुस्लिम समाजाला दिलेल्या 5% शैक्षणिक आरक्षण शासनाने तातडीने अंमलबजावणी करावी आणि वंचित बहुजन आघाडीने दिलेले पैगंबर मोहम्मद बिल पास करण्यात यावा असे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. आता त्याच संदर्भात राज्यव्यापी आंदोलन जालना जिल्ह्यात प्रत्येक तहसिल /जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याची हाक पक्ष कार्यालय वंचित बहुजन आघाडीच्या वतीने देण्यात आली होती त्या अनुषंगाने जालना जिल्हा पश्चिम अध्यक्ष डेव्हिड घुमारे व पूर्व जालना जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली जालना शहराध्यक्ष कैलास रत्नपारखे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य आंदोलन करण्यात आले. यावेळी
खालील मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले
यावेळी न्यायालयाने दिलेल्या 5% मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करावा.तसेच धार्मिक भावना भडकवणाऱ्या समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाडीने शासशाला सुपूर्द केले आहे. ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ तो कायदा लागू करावेत. महाराष्ट्र वक्फ बोर्डाच्या मिळकती मध्ये वाढ करून इमाम, व मुअज्जिन आणि खुद्दाम हजरत यांना मासिक वेतन सुरू करण्यात यावे.संत विचारांचा प्रचार प्रसार करणाऱ्या ह.भ.प. कीर्तनकार यांना शासनाकडून वेतन सुरू करण्यात यावे.वक्फ बोर्डाच्या जमिनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेचा अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी उपयोग करावा.
सारथी – बार्टी महाज्योती प्रमाणे मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष पश्चिम डेव्हिड घुमारे, पूर्व जालना जिल्हाध्यक्ष भालचंद्र भोजने, शहराध्यक्ष कैलास ,अकबर इनामदार, खालेद चाउस, रमा होर्शिळ, जया आठवले, प्रशांत कसबे, सचिन कांबळे, प्रा संतोष आढाव, शफिक अत्तार, ज्ञानेश्वर जाधव, विनोद दांडगे, मनोज शर्मा,गौतम वाघमारे, रामदास दाभाडे,अफसर चौधरी, लतीफ शेख, राजरत्न आचलखांब, योगेश म्हस्के, कैलास जाधव, सुनिल मगरे, मिलिंद रगडे, परमेश्वर भालमोडे, राजेभाऊ दाहिजे, सविता गुडेकर ,मिना काळे, सुशीला साळवे, सोनी चांदणे सह वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.