40 हजारांची लाच घेताना खासगी इसमासह कृषी सहाय्यक अधिकारी लाचेच्या जाळ्यात
जालना जिल्ह्यातील मंठा येथे लाचलुचपत विभागाने सापळा रचून केली कारवाई
जालना प्रतिनिधी:
पोखरा योजनेतंर्गत रेशीम शेती करण्यासाठी मंजूर झालेले अनुदान खात्यावर जमा करण्यासाठी खाजगी इसमामार्फत 20 हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या खाजगी इसम व कृषी सहाय्यक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने साचळा रचून रंगेहाथ पकडले.महेश दिनकर खंडागळे असे लाचखोर कृषी सहाय्यकाचे नाव आहे.मंठा येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत होते.यातील तक्रारदार यांच्या वडीलांच्या नावे पोखरी टाकळी शिवारात गट नंबर 163 व भावाच्या नावे असलेल्या गट नंबर 180 मध्ये शासनाच्या पोखरा योजनेतंर्गत रेशीम शेती करणें व तुतीचे रोप लावण्यासाठी मंजूर झालेले अनुदान खात्यावर जमा करण्यासाठी प्रत्येकी फाईलचे 20 हजार प्रमाणे 4 लाख रूपयांची मागणी केली होती.खाजगी इसमाकडे 20 हजार रूपये देण्याचे कृषी सहाय्यक यांनी तक्रारदारांना सांगितले. याबाबत तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.लाचलुचपत विभागाने साचळा रचला तडजोडीअंती खाजगी इसमाला पंचासमक्ष 20 हजारांची लाच घेताना कृषी साहेब महेश दिनकर खंडागळे व खाजगी व्यक्ती सुनील अंकुश सोनटक्के यांना रंगेहाथ पकडण्यात आले. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी मंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे एस.बी.पाचोरकर,पोलीस उप अधिक्षक,पोलिस निरीक्षक एस.एस.शेख,पोलीस अंमलदार मनोहर खंडागळे,गणेश चेके,जावेद शेख,चालक प्रविण खंदारे, आदींनी केली.