मराठावाडा

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मंठा शाखेला सर्वोत्कृष्ट कार्याबद्दल विभागीय पुरस्कार प्रदान

कुलदीप पवार/ प्रतिनिधी :

images (60)
images (60)

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या लातूर येथे झालेल्या मराठवाडास्तरीय अधिवेशनात पत्रकार संघाच्या मंठा शाखेला उत्कृष्ट कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते विभागीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. रविवार ता. 28 रोजी दयानंद सभागृह लातूर येथे आयोजित मराठवाडास्तरीय विभागीय अधिवेशनाला राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे, राज्य संघटक संजय भोकरे, दिल्ली येथील जेष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, विभागीय अध्यक्ष वैभव स्वामी, लातूर पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक देडे, जालना जिल्हाध्यक्ष दिगंबर गुजर आदींच्या हस्ते विभागीय स्तरावरील प्रथम पुरस्कार पत्रकार संघाच्या मंठा शाखेला देण्यात आला. मंठा पत्रकार संघाने ज्येष्ठ पत्रकार बाबासाहेब कुलकर्णी, विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष दायमा, तालुकाध्यक्ष बालाजी कुलकर्णी, अनिल बा. खंदारे, अमोल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोना काळात गरजूंना अन्नधान्याचे किट वाटप केले, रक्तदान शिबिर, दीपावली स्नेहमिलन, आषाढी एकादशीला भावीक भक्तांना फराळाचे वाटप आदी सामाजिक उपक्रम राबविले तसेच राज्य पत्रकार संघाने वेळोवेळी दिलेल्या सूचनेप्रमाणे सामाजिक कार्यक्रमांचे नियोजन करून मराठवाड्यात वेगळा आदर्श निर्माण केला. मंठा पत्रकार संघाच्या कार्याची दखल घेऊन राज्य पत्रकार संघाने हा विभागीय स्तरावरील पुरस्कार दिला. यावेळी पत्रकार संघाचे विभागीय कार्याध्यक्ष पंडितराव बोराडे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष दायमा, तालुकाध्यक्ष बालाजी कुलकर्णी, कार्याध्यक्ष अनिल बा. खंदारे, अमोल राऊत, डॉ. आशिष तिवारी, रमेश देशपांडे, विजयकुमार देशमुख, वसंतराव राऊत, आसाराम शेळके, मानसिंह बोराडे, सखाराम कुलकर्णी, विजय राठोड आदींची उपस्थिती होती.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!