घनसावंगी तालुका

घनसावंगी नगरपंचायतमध्ये शिवसेना व राष्ट्रवादीकाँग्रेस थेट लढत

घनसावंगी /नितीन तौर

images (60)
images (60)

घनसावंगी नगरपंचायत निवडणूकी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी १७ ही वॉर्डात उमेदवार उभे केले आहेत . त्यामुळे आता शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे तर काँग्रेसने आपला एकही उमेदवारी अर्ज दाखल केला नाही . वंचित बहुजन आघाडीने तीन उमेदवारी अर्ज दाखल केले तर भाजपनेही मिळतील तेवढे उमेदवार उभे करण्याचा प्रयत्न केला आहे .

घनसावंगी नगरपंचायत निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी पाच वाजेपर्यंत ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत . एकूण ८५ नामनिर्देशनपत्रे दाखल झाल्याचे सांगण्यात आले . शेवटच्या दिवशी दोन तासांचा वेळ वाढवून देण्यात आला होता . त्यामुळे दुपारी तीन वाजता दाखल करावयाचे अर्ज पाच वाजेपर्यंत स्वीकारण्यात आले . सोमवारी दिवसभरात १४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते , तर मंगळवारी ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत . उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची चांगलीच धांदल उडाली .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!