जालना जिल्हात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या नवीन जागा वाढणार?
जालना : राज्यातील जिल्हा परिषद , पंचायत समित्यांमधील गट , गण लोकसंख्या वाढीनुसार वाढविण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला असून , याबाबतचा ठराव अधिवेशनात मांडला जाणार आहे . हा ठराव मंजूर केल्यानंतर जालना जिल्हा परिषदेत आठ , तर पंचायत समित्यांमध्ये १४ सदस्य वाढण्याची शक्यता आहे .
शासनाच्या या निर्णयामुळे ज्यांना जिल्हा परिषद , पंचायत समिती निवडणूक लढविण्याची इच्छा आहे , अशा कार्यकर्त्यांचा उत्साहही वाढला आहे . मंत्रिमंडळाच्या ठरावाला अधिवेशनात मंजुरी मिळाल्यानंतर तो ठराव निवडणूक विभागाकडे पाठविला जाणार आहे . त्यानंतर निवडणूक विभागाच्या सूचनेनुसार गट , गणांची रचना होणार आहे . गट- गणांच्या रचनेनंतर गट – गणांची स्थिती अंतिम होणार आहे . एकूणच अधिवेशनातील ठराव मंजूर झाल्यानंतर मिनी मंत्रालय वाढणार असून , नवीन आठ सदस्य आगामी निवडणुकीतून पुढे येणार आहेत