मंठा तालुका

मंठा तालुक्यातील तळणी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस मिळेना

डाॅक्टर गैरहजर : पंप नादुरुस्त ; विकतचे पाण्यावर ताहण

images (60)
images (60)


ए. राऊत । तळणी

तळणी : मंठा तालुक्यातील तळणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध असतानाही केवळ लसीकरणाची नोंदणी करण्या-या कर्मचारी वेळेपूर्वीच निघून गेल्याने लस घेण्यासाठी आलेल्या तरुण व महिलांना लस न मिळाल्याने परतावे लागले. शनिवारी दुपारी ४ वा. बाब उघड झाली . या घटनेमुळे आरोग्य मंत्र्यांच्या जिल्हातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वास्तव चित्र समोर आले.

तळणी ( ता. मंठा ) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवार लसीकरण सुरु होते. दुपारपर्यंत जवळपास ४० जणांचे लसीकरण पार पडले . दुपारी ३ नंतर लसीकरणासाठी कुणी येणार नाही , असे समजून लसीकरणाची नोंदणी करणाऱ्या कर्मचारी ( अपडाऊन लोणार , जि. बूलढाणा ) निघून गेल्या. त्यानंतर लसीकरणासाठी तळणी व खेड्यावरुन आलेल्या महिला व तरुणांना केंद्रातील उपस्थित कर्मचा-यानी लस नाही , आधार कार्ड जन्म तारीख जुळत नाही यासह इतर कारणे देत लस न देता परत पाठविले. लस न मिळाल्याने संबंधित लाभार्थीनी हा प्रकार पत्रकारांच्या निर्दशात आणून दिल्यानंतर दुपारी ४ वा. तळणी येथील पत्रकार अमोल राऊत , प्रदिप तळणीकर व बाळु गायकवाड यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन चौकशी केल्यानंतर बहुतांश वैद्यकीय अधिकारी , आरोग्य सेवक व सेविका तसेच शिपाई गैरहजर आढळून आले.

एकीकडे लसीकरणाची टक्केवारी वाढविण्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह जिल्हाधिकारी डाॅ. विजय राठोड , अप्पर जिल्हाधिकारी अंकूश पीनाटे, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जिदल , जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी विवेक खतगावकर यांच्यासह मंठा तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे, मंठा तालुका आरोग्य अधिकारी मुकेश मोठे , मंठा पोलीस निरीक्षक संजय देशमुख व अनेकजन प्रयत्न करीत आहेत . जागरुक नागरिकही लस घेण्यासाठी केंद्रावर येत आहेत . मात्र, दुसरीकडे प्रा. आ. केंद्रात सोईसुविधा अभाव असून केंद्रातील डाॅक्टर व कर्मचारी गैरहजर राहत असून नागरिकांना लस मिळत नसल्याने परतावे लागत आहे. या गैरहजर कर्मचाऱ्यावर ठोस कारवाई करण्याची हिंमत वरिष्ठ दाखवतील ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

४ हजार ३४१ जणांनी घेतला पहिला डोस …

तळणी गावांतील ४ हजार ३४१ जणांनी पहिला डोस घेतला असून १ हजार ७४५ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही ४४९ जणांचे लसीकरण बाकी आहे यातील ४३० जण स्थलांतरित असून १९ जण अतिअस्वस्थ व वयोवृद्ध आहेत.

हे कर्मचारी केंद्रात हजर …

शनिवारी दुपारी ४ वा. प्रा. आ. केंद्राला भेट दिल्यानंतर आरोग्य सेविका शिवकन्या सानप , कंत्राटी कर्मचारी कृष्णप्रकाश सानप , सदिपसिंह गेहिलोत व डोंगरे हजर आढळून आले .

लस न मिळाल्याने परतावे लागले …

तळणी येथील कृष्णा सरकटे यांना लस नसल्याचे सांगितले. तर दिपक सरकटे हे लस घेण्यासाठी आले असता, आधार कार्डवरील जन्म तारीख जुळत नाही असे म्हणत लस न दिल्याने परतावे लागले. लस न मिळालेल्याना सोमवारी या असेही उपस्थित आरोग्य कर्मचा-यानी सांगितले.

इमारतीचे काम अपूर्ण , निवासस्थानाची दुरावस्था …

तळणी येथील प्रा. आ. केंद्राचा इमारतीचे काम अपूर्ण आहे. तर निवासस्थानाचे काम अपूर्ण आहेत. निवासस्थानात दरवाजे , खिडक्या, पंखे व लाईट गायब असून ठिकठिकाणची वायरींग उघडले. तर काचेच्या खिडक्या फुटलेल्या आहेत. बोअरवेलमधील पंप नादुरुस्त असून निवासस्थानातील कर्मचा-याना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.

केंद्रातील कचरा रस्तावरच …

प्रा. आ. केंद्रातील रिकामे सलाईन व इतर कचरा केंद्रालगतच्या रस्त्यावरच टाकला जात आहे. तर केंद्रात वृक्षारोपणासाठी आणलेले शेकडो वृक्ष जाळुन टाकण्यात आल्याचे दिसून आले.

वैद्यकीय अधिकरी रजेवर …

प्रा. आ केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. पायल भावसार ह्या रजेवर त्यांनी इतर कर्मचाऱ्याकडे चार्ज देण्यात आल्याचे बालाजी भावसार यांनी सांगितले.

गैरहजर कर्मचाऱ्यांचे टीएचओकडून समर्थन …

या सर्दभात मंठा तालुका आरोग्य अधिकारी मुकेश मोठे यांना प्रा. आ. केंद्रात कर्मचारी गैरहजर असल्याने लस न घेता परतावे लागल्याचे विचारले असता, काही काम असेल म्हणून गेल्या असतील , असे म्हणत गैरहजर कर्मचाऱ्याचे समर्थन मोठे यांनी केले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!