घनसावंगी तालुका
जांबसमर्थला ग्रामपंचायत पोट निवडणुकीत 82 टक्के मतदान.
जांब समर्थ ( दिं.21)
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील ग्रामपंचायत पोट निवडणुकीच्या एका जागेसाठी मंगळवारी (दिं.21) 82 टक्के मतदान शांततेत झाले, दरम्यान एकूण 759 मतदारांपैकी 620 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाबला.
यावेळी मतदान केंद्राध्यक्ष मिलिंद दुवे, जी.एन.राकुडवार , ए. बी. खरात, एच. के.वाहने आदींच्या उपस्थितीत सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली.
पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी रामदास केंद्रे, भागवत हरीशचन्द्रे, विष्णू कुटे , होमगार्ड भगवान पानखडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला. दरम्यान तलाठी विजय बुचुडे, मुख्याध्यापक गजानन कुलकर्णी, सहशिक्षक विक्रम ठोंबरे, पोलीस पाटील भास्कर खाडे, उद्धव तांगडे, संभाजी तांगडे आदींनी त्यांना मदत केली.. पोट निवडणुकीत