जालना जिल्हा

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही ओबीसी मोर्चाचा निर्धार


जालना(प्रतिनिधी) : राज्यात आगामी काळात होणार असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही असा ठाम निर्धार समस्त ओबीसी मोर्चाच्या बैठकीत करण्यात आला आहे.सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगर पंचायत निवडणुकीत राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी समाजासाठी आरक्षित असलेल्या जागा अनारक्षित केल्या
 आहेत.

images (60)
images (60)

या पार्श्वभूमीवर समस्त ओबीसी मोर्चा जालनाची बैठक आज दि.22 डिसेंबर बुधवार रोजी हॉटेल अथर्व येथे पार पडली.या बैठकीस जिल्हाभरातून सर्वपक्षीय ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.ओबीसी समाजाचे राजकिय व नोकरीतील पदोन्नतीचे आरक्षण रद्द झाल्यामुळे अस्वस्थ असलेल्या ओबीसी बांधवांनी आपापल्या भाषणातून आक्रोश व्यक्त केला.सर्व प्रस्थापित पक्ष ओबीसी विरोधात आहेत.

त्यामुळे आपला लढा आपल्यालाच लढावा लागेल.यावर एकमत झाले.आपले आरक्षण जाण्याचे कारण ओबीसी संयमी व झोपलेले आहे त्यामुळे सर्वच सरकारे आपल्यावर अन्याय करण्याची प्रवृत्ती बळावली आहे.आणि त्यामुळेच आपल्याला एकत्र येऊन लढा देण्याची गरज आहे.याचाच निर्धार आज बैठकीत घेण्यात आला.जो पर्यंत ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण पुर्ववत लागु होत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही असा सुर बैठकीत उमटला.

लोकसभा,विधानसभेत देखील मंडल आयोगाच्या शिफारशी नुसार आरक्षण मिळाले पाहिजे यावरही मान्यवरांनी विचार मांडले आणि येत्या दि.25 डिसेंबर शनिवार रोजी दुपारी १२ वा.हॉटेल अथर्व औरंगाबाद रोड, जालना येथे पुढील आंदोलनाची नियोजन बैठक घेण्यात येईल.सदर बैठकीस जिल्हाभरातून सर्वपक्षीय ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान समस्त ओबीसी मोर्चा जालनाच्या वतीने करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!