विशाल निकम ‘बिग बॉस मराठी सिझन 3’चा महाविजेता
विशाल निकम ‘बिग बॉस मराठी सिझन 3’चा (Bigg Boss Marathi 3) महाविजेता ठरला आहे. विशाल निकम, जय दुधाणे, उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, मीनल शहा या पाच स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली होती. 100 दिवासांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरात नव्या सदस्यांची एन्ट्री झाली होती. त्यामुळे महाराष्ट्रात एंटरटेनमेंट अनलॉक झाले. या प्रवासाची सुरुवात झाली 15 सदस्यांसोबत, त्यानंतर आदिश आणि नीथा शेट्टी यांची वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली आणि आता बघता बघता ‘बिग बॉस मराठी सिझन 3’ने निरोप घेतला आहे.
बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांनी कधी भांडणाने तर कधी रडण्याने तर कधी त्यांच्यातील प्रेमाने तर कधी त्यांच्या मैत्रीने बिग बॉसच्या घराला घरपण आले. पण आता हा प्रवास संपला आहे. घराघरांत ‘बिग बॉस मराठी 3’ कार्यक्रमाची चर्चा सुरू होती. टॉप 5 मधून कोणता सदस्य ठरणार बिग बॉस मराठी सिझन 3 चा महाविजेता हे जाणून घेण्याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली होती. 17 सदस्यांसोबत सुरू झालेला 100 दिवसांचा प्रवास आता संपला आहे. विशाल निकमला 20 लाख धनराशी आणि ट्रॉफी मिळाली आहे. खेळाडूवृत्ती, टास्क जिंकण्याची जिद्द, घरातील वावर, स्पष्टवक्तेपणा यामुळे तो नेहमीच चर्चेत राहिला.
कोण आहे विशाल निकम?
विशालचा जन्म 10 फेब्रुवारी 1994 रोजी सांगली जिल्ह्यातील देविखिंडी येथे झाला. विशालला अभिनयासोबतच फिटनेसचीदेखील आवड आहे. विशालने त्याच्या करिअरची सुरुवात मिथुन या सिनेमाद्वारे केली. हा सिनेमा 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता.