मनोरंजन

परतुरचा योगेश कुलकर्णी धर्मवीर चित्रपटात साकारतोय ‘मुख्यमंत्री’ !

जालना: प्रतिनिधी

images (60)
images (60)

शिवसेनेचे राजकीय व सामाजिक कार्याने ख्यातनाम असलेले दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवन चरित्रावरील जीवनपट असलेल्या धर्मवीर या चित्रपटांमध्ये परतुर चा नवोदित कलाकार योगेश कुलकर्णी हा झळकणार आहे हा चित्रपट राज्य घरांमध्ये 13 मे रोजी प्रदर्शित होणार आहे.
मराठवाड्यातील अभिनेते असलेले मंगेश देसाई यांचा हा पहिलाच प्रोड्युस केलेला चित्रपट आहे, चर्चेतील देऊळबंद, मुळशी पॅटर्न, हंबीरराव या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिग्दर्शन केले असून प्रसाद ओक हे स्व.आनंद दिघे यांची भूमिका साकारत असून, यात मराठवाड्यातील योगेश सिरसाट व दिलीप घारेसर औरंगाबाद, रायबा गजमल गेवराई व परतुरचा योगेश कुळकर्णी यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहे.

परतुरात सिने कलाकारांची छाप

पाहूणा कलाकार म्हणून योगेश तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भूमिका साकारत आहेत.
यापूर्वी परतूर येथील शिक्षकाचा मुलगा असलेला प्रतीक लाड हा बॉईज या चित्रपटात चमकला होता. शहरात तलाठी असलेले अरुण कुलकर्णी यांनीही नाटक व शॉर्ट फिल्म मध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.
योगेशने आत्तापर्यंत ७ ते ८ झी टीव्ही वरील मालिकेत काम करीत आहे यात जय जय स्वामी समर्थ, आई कुठे काय करते, बाळू मामाच्या नावाने चांगभलं, यात काम करीत आहे शिवाय झी च्या प्रसिद्ध हास्य मालिका ‘चला हवा येऊ द्या’ यात प्रसिद्ध निवेदक निलेश साबळे व प्रसिद्ध कलाकार भाऊ कदम यांच्या सोबत काम करीत आहे, मोठ्या पडद्यावर त्याचा हा ३ रा चित्रपट आहे.
योगेश सामान्य परिवारातील असून, वाडील विना संघर्षातून भावंडांच्या साहाय्याने मार्ग शोधला.

(शब्दाकन – केदार शर्मा परतूर)

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!