जळगाव सपकाळ येथील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांनी साकारली विविध किल्ल्यांची प्रतिकृती
जळगाव सपकाळ,:—
भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथील अादिवासी अाश्रम शाळेतील मुला मुलींनी “जिजाऊ ते साविञी” सन्मान महाराष्टृाच्या लेकींचा या अभियाना अंतर्गत मुरुड जंजीरा,प्रतापगड,रामरोन,भुईकोट,इत्यादी किल्यांची प्रतिकृती तयार केली.
भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप अाहे अशी दोन महत्वाची स्ञीरत्ने म्हणजे राजमाता जिजाऊ अाणी क्रांतिज्योती साविञीबाई फुले या महान स्ञियांच्या कर्तृत्वाचा व व्यक्तिमत्वाचा अादर्श घेऊन अाजच्या मुलीनी अापल्या जीवनाची वाटचाल केल्यास सक्षम स्वावलंबी अाणी धाडसी समाज निर्माण होण्यास नक्की मदत होईल त्यामुळे शालेय स्तरावर दि.३ जानेवारी ते १२ जानेवारी या दरम्यान सर्व शाळामध्ये “जिजाऊ ते साविञी सन्मान महाराष्टृाच्या लेकीचा अभियान अंतर्गत विघार्थी अाणी शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्या अनुषंगाने अादिवासी अाश्रम शाळेतील विघार्थी व शिक्षक यांनी विविध किल्यांची प्रतिकृती बनवुन विघार्थी यांना महत्व पटवुन दिले.
यामध्ये शाळेतील अजय गवळी,विजय इंगळे,शुभम गवळी,प्रितम जाधव,सुदर्शन जाधव,अाकाश दांडगे,विशाल दांडगे,मधुकर वाघ,ञषीकेश सपकाळ,विजय बारेला,सुनिल बारेला,अशोक बारेला,जितेन बारेला,माधुरी,विदया इंगळे,या विघार्थ्यानी सहभाग घेतला होता.
शाळेतील शिक्षक ए.बी. चोरमारे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शाळेचे प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापक जे.व्ही.कराड व अनिल सोनवणे यांच्या मार्गदर्शनात विघार्थी यांनी किल्यांची प्रतिकृती तयार केली यावेळी शाळेतील श्रीमती ए.व्ही.देशमुख,एस.एस.जाधव,एस.यु.रोजेकर,जी.जी.वराडे,अार.व्ही.दांडगे,व्ही.एस.सोनुने,एस.एम.कोरडे,व्ही.बी.पंडीत,के.एस.साळवे,पी.एस.वाघमारे यासह सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्थीती होती.
२२ वर्षानंतर वर्गमित्र एकत्रितगेट-टु-गेदर – बालपणीचा आठवणींना उजाळा