जालना प्रशासकीयअधिकारी, कर्मचाऱ्यांच्याआरटीपीसीआर चाचण्या
जालना, दि. 13 :- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्यासह प्रशासकीय ईमारतीमध्ये असलेल्या विविध विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कोव्हीड-19 च्या अनुषंगाने आरटीपीसीआर चाचण्या आज दि. 13 जानेवारी, 2022 रोजी नियोजन समितीच्या सभागृहात करण्यात आल्या.
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सर्व विभाग प्रमुखांसह त्यांच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी स्वत: त्यांचीही चाचणी करुन घेतली. तसेच सर्व विभागांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी उत्स्फुर्तपणे आपल्या चाचण्या करुन घेतल्या. प्रशासकीय ईमारतीमधील दोनशेपेक्षा अधिक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायजरचा वापर तसेच सामाजिक अंतराचे पालन करण्याच्या सुचनाही प्रशासनामार्फत देण्यात आल्या आहेत. आरोग्य प्रशासनातील सिद्धेश्वर नरवडे व ताराचंद पवार यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या.