घनसावंगी तालुका

तीर्थपुरीमध्ये विनामास्क रहदारी करणा-या नागरीकांवर दंडात्मक कारवाई

    जालना दि. 13  :-  तीर्थपुरी शहरात कोविड नियमावलीचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर व आस्थपनावर उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस  यांच्या नेतृत्त्वाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली.

images (60)
images (60)

       यावेळी कार्यवाहीमध्ये तहसीलदार घनसावंगी नरेंद्र देशमुख,मुख्याधिकारी नगरपंचायत तीर्थपुरी गौरवकुमार खैरणार , मंडळ अधिकारी श्री. पाठक, तलाठी राजु शेख, सह पोलिस निरीक्षक दिपक लंके, पोलीस कर्मचारी योगेश दाभाडे, नगरपंचायत कर्मचारी शिंदे, माळी यांचा सहभाग होता.

     यावेळी 43 विनामास्क रहदारी करणा-या नागरीक  व आस्थापनांकडुन शासकीय नियमाप्रमाणे दंडात्मक कार्यवाही करत 2 हजार 600 रुपये दंड  वसुल करण्यात आला व संबंधीतांना समज देण्यात आली व परिसरातील सर्व नागरीकांना लसीचे दोन डोस घेण्याचे तसेच मास्क वापरुन गर्दी न करण्याचे सोशल डिस्टंसींगचे पालन करुन कोरोना दुर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!