जालना जिल्हा

‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ आ. गोरंटयाल यांचा खोतकर यांच्यावर पलटवार

जालना प्रतिनिधी

images (60)
images (60)

जालना शहर व मतदार संघाच्या विकासात ज्यांनी कवडीचेही योगदान दिले नाही. त्यांनी शहरातील रस्त्याचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करणे म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे’ अशा शब्दात आ. कैलास गोरंटयाल यांनी अर्जुन खोतकर यांच्यावर पलटवार केला आहे.

जालना शहरातील मस्तगड ते रेल्वे स्टेशन या रस्त्याच्या सुरू असलेल्या कामाला माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली व सदर रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप केला होता.

माजी राज्यमंत्री खोतकर यांच्या या आरोपाचा आ. कैलास गोरंटयाल यांनी आज गुरुवारी आपल्या खास शैलीत समाचार घेतला.

ते म्हणाले की, चार वेळा आमदार आणि दोन वेळा राज्य मंत्रिमडळात संधी मिळाल्यानंतरही जालना शहर व मतदार संघातील जनतेला सांगता येईल किंवा दाखवता येईल असे एकही ठोस काम ज्यांना करता आले नाही. त्यांनी अशा प्रकारे आरोप करणे हास्यास्पद आहे. असल्याचे म्हटले आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!