टेक्नॉलॉजी

सर्वप्रथम ‘या’ शहरांतील ग्राहकांना मिळणार 5G सेवा; पाहा यादीत तुमच्या शहराचं नाव आहे का?

 5 G Services In India : गेल्या काही महिन्यांपासून देशात 5G सेवांची चाचणी सुरू असून अनेक ग्राहक या सेवांच्या प्रतीक्षेत आहेत. पुढील काही महिन्यांमध्ये भारतात 5G सेवांची सुरूवात होऊ शकते. दरम्यान, ही 5G सेवा सर्वच शहरांमध्ये उपलब्ध नसेल. दूरसंचार विभागानं (DoT) दिलेल्या माहितीनुसार 5G सेवा प्रथम भारतातील काही ठराविक शहरांमध्ये सुरू केली जाणार आहे.

images (60)
images (60)

२०२२ मध्ये एकूण १३ शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येईल. यामध्ये मुंबई, पुणे, कोलकाता, गुरुग्राम, बंगळुरू, चंडीगढ, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनौ आणि गांधीनगर या शहरांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून दूरंसचार कंपन्या 5G सेवांच्या चाचण्या करत आहे. 5G च्या मदतीनं अधिक इंटरनेट स्पीड शिवाय स्मार्टफोनच्या तुलनेत आणखी काही उपकरणे जोडण्यासही मदत मिळू शकते.

रिलायन्स जिओ, भारती एअरटेल, व्होडाफोन आयडिया यासारख्या कंपन्यांनी देशातील काही शहरांमध्ये 5G चाचणीसाठी साईट्स उभारल्या आहेत. ही मेट्रो आणि मोठी शहरं देशात 5G सेवा सुरू करणारी पहिली ठिकाणं असतील, असंही दूरसंचार विभागानं स्पष्ट केलं.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!