आता मेट्रोचे तिकीट मिळणार व्हॉट्सअॅपवर , तंत्रज्ञानाचा वापर
तंत्रज्ञान :-
आता व्हॉट्सअॅप नंबरवर ई-तिकीट दिले जाणार असून गुरुवारी अंधेरी येथे या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
मुंबई मेट्रो वन प्रा. लिमिटेडने प्रवाशांना नवनवीन सेवा देण्यात येत असते.
घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱया मुंबई मेट्रो वन प्रा. लिमिटेडने आता प्रवाशांसाठी व्हॉट्सअप नंबरवर ई-तिकीट देण्याची सुविधा सुरू केली आहे. याआधी ‘क्यूआर कोड’ असलेले पेपर तिकीट दिले जात होते.
सध्या सिंगल जर्नी तिकीट आणि स्मार्ड कार्डने ज्या स्थानकावर जायचे आहे त्याचे भाडे देणे, यानंतर प्रवाशांच्या मागणीवरून मेट्रो वनने रिटर्न जर्नी तिकीट आणि मासिक पास योजना आणली.
आता बँक कोम्बो कार्ड, मोबाईल क्यूआर तिकीट, लॉयल्टी प्रोग्रॅम अशा योजनांनंतर मुंबई मेट्रो वन व्हॉट्सअॅप क्यूआर कोड तिकीट योजना आणली आहे. आता व्हॉट्सअॅपवरील सेटिंग पर्याय निवडून मेट्रो स्थानकावरील क्यूआर कोड स्कॅन करून ई-तिकीट घेता येणार आहे.
असे मिळवा व्हॉट्सअॅपवर तिकीट
मोबाईल क्र. 9670008889वर इंग्रजीत हाय करून किंवा क्यूआर स्कॅन करून व्हॉट्सअॅपवर आलेला ओटीपी नंबर तिकीट काऊंटरवर दिल्यानंतर तुमच्या मोबाईल व्हॉट्सअॅपवर ई-तिकीट लगेच येईल.
ही पद्धत पारंपरिक तिकीट खरेदीपेक्षा दुप्पट वेगवान असून प्रवाशांच्या वेळेत बचत होणार आहे. शिवाय तिकीट फाटण्याची किंवा गहाळ होण्याची भीती राहणार नाही.तसेच ऑटोमेटीक गेटवरही सहज वापर करता येणारी पद्धत आहे. अशा प्रकारचे व्हॉट्सअॅपवर तिकीट उपलब्ध करून देणारी मुंबई मेट्रो वन ही पहिली मेट्रो ठरल्याचा दावा कंपनीने केला आहे.