टेक्नॉलॉजी

तुमच्या नावावर सिमकार्ड किती आहेत माहिती पाहिजे मग ही बातमी वाचा !

दिल्ली व्रतसंस्था : सर्वजण आपल्या धकाधकीच्या जीवनात आपण वावरत असलेल्या नंबर शिवाय आपल्या नावावर आणखी किती सिमकार्ड आहेत याची माहिती आपल्याला नसते शिवाय ही माहिती कुठलीही टेलिफोन ऑपरेटर आपल्या ग्राहकांना देत नसल्याने आपल्या कागदपत्रे वापरून कोणी दुसरे सिमकार्ड घेतले का हे पाहण्यासाठी सध्या ट्रॉय कडून एक अधिकृत पोर्टल सुरू करण्यात आले आहे यामुळे आपण वापरत नसलेल्या व आपल्या नावावर असलेले सिमकार्ड आपण पूर्णपणे बंद करू शकतात किंवा रिपोर्ट करू शकतात यामुळे आपली सुरक्षितता आणखी वाढते

images (60)
images (60)

अनेकदा गुन्हेगार ओळखपत्रावरील माहिती बदलतात. ते ओळखपत्रावरील फोटो, पत्त्यात बदल करू शकतात व याचा वापर कर्जासाठी, बँक खाते उघडण्यासाठी करू शकतात. या कामासाठी आधार, पॅन कार्ड अथवा ड्रायव्हिंग लायसन्सचा उपयोग केला जाऊ शकतो. तुमच्यावर किती सिम कार्ड आहेत, हे जाणून घ्यायचे असल्यास दूरसंचार विभागाने (DOT) एक पोर्टल सुरू केले आहे. सध्या ही सुविधा फक्त तेलंगाना आणि आंध्रप्रदेश या राज्यात उपलब्ध आहे.पण तुम्ही कुठलेही नंबर चेक करू शकतात हे फसवणूक टाळणे आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी tafcop.dgtelecom.gov.in हे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर तुम्हाला तुमचा मोबाईल टाकावा लागेल. त्यानंतर तुमच्या आधारवर रजिस्टर असलेल्या सर्व फोन नंबर्सची माहिती मिळेल

तसेच, एखादा नंबर तुम्हाला अनधिकृत वाटत असल्यास तुम्ही DoT कडे तक्रार करून ब्लॉक करू शकता. तसेच, तुमच्या अन्य कागदपत्रांचा चुकीच्या कामासाठी उपयोग केला जात नाहीये ना, हे तपासण्यासाठी क्रेडिट रिपोर्ट पाहा. क्रेडिट रिपोर्टमध्ये कोणतीही संशयास्पद रक्कम दिसत नाही ना, हे तपासा. या रिपोर्टमध्ये रजिस्टर फोन नंबर आणि ईमेलची देखील माहिती मिळते. तुम्हाला जर कोणतीही माहिती संशयास्पद वाटल्यास क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या कंपनीशी संपर्क साधू शकता. तसेच, पोलिसात देखील तक्रार करू शकता. तसेच, तुम्ही दर तीन महिन्यांनी मोफत क्रेडिट रिपोर्टची माहिती घेऊ शकता

ओळखपत्रांचा वापर इतर व्यक्ती चुकीच्या कामासाठी देखील करण्याची शक्यता असते. तसेच, या मोबाइल क्रमाकांचा वापर चुकीच्या कामासाठी केल्यास याचा मोठा फटका तुम्हाला बसू शकतो. याशिवाय, या नंबरचा वापर करून गुन्हेगार बँक खाते देखील रिकामे करू शकतात. आधार कार्डच्या मदतीने नवीन सिम कार्ड घेणे हे खूपच सोपे आहे. त्यामुळे तुमच्या नावावर कोणी कोणी सिम कार्ड घेतले आहे हे आपल्याला माहिती नसते. मात्र, तुम्ही एका सोप्या पद्धतीने ही माहिती जाणून घेऊ शकता.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!