मंठा तालुका

रोहीत्र जळाल्याने मंठा तालुक्यातील तळणी बस स्टँड भाग अंधारात

तळणी : ता.मंठा

images (60)
images (60)

मंठा तालुक्यातील तळणी बस स्टँड भागातील रोहीत्र जळाल्याने ( ता. १५ ) शनिवार रोजी दिवसभर व रात्रभर वीजपूरवठा खंडीत होता. तब्बल ३६ तास वीजपूरवठा खंडित राहणार असल्याने विजेवर आधारित व्यावसायिकाचे मोठे नुकसान झाले . रविवारी सायंकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होईल, यासाठी महावितरणकडून प्रयत्न सुरु आहे.

मंठा तालुक्यातील तळणी बस स्टँड भागातील या ना त्या कारणाने सतत विजपूरवठा विस्कळीत असतो . विजेच्या समस्येमुळे बस स्टँड भागातील व्यावसायिक त्रस्त आहेत . बस स्टँड भागात विजेवर आधारित जवळपास २०० व्यवसायिक आहेत. विषेश म्हणजे , नियमित व मोठ्या प्रमाणात वीजबील बस स्टँड भागातून दर महिन्याला वसूल होते. ९० टक्के वीजबील वसूलीनंतरही कधी दिवसभर तर कधी रात्रभर वीज पुरवठा गायब असतो. त्यातच किरकोळ कारणांसाठी तासनतास विजपूरवठा खंडीत केला जातो. खंडित विजपूरवठ्याबाबत विचारणा केल्यानंतर महावितरणकडून दुरुस्तीचे कारण दिले जाते. मात्र , दररोज महावितरणकडून नेमकी दुरुस्ती कोणती ? दुरुस्तीनंतर वारंवार वीजपूरवठा खंडित होते कशा ? महावितरणकडून नियमबाह्य अप्रशिक्षित व्यक्तींकडून कामे का ? खाजगी व्यक्तींकडून कामे मग , लाईनमन फक्त नावालाच का ? बिले न भरताच विजपूरवठा खंडीत मग, रोहीत्र वेळेवर न मिळाल्यामुळे व्यवसायिकाची नुकसान भरपाई महावितरण देणार का ? असे एक नव्हे अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

अप्रशिक्षित व्यक्तींकडून कामे थांबवावी …

तळणी येथे लाईनमन नावालाच असून लाईनमन इतर खाजगी अप्रशिक्षित व्यक्तींकडून महावितरणची कामे करत असल्याच्या तक्रारी आहेत. दुरूस्तीची नावाखाली खाजगी व्यक्तीं आर्थिक पैसे उकळुन कामे करतात. त्यामुळे बस स्टँड भागात वारंवार वीजपूरवठा गायब असतो. याकडे महावितरणच्या जिल्हातील वरिष्ठ अधिका-यांनी लक्ष देण्याची गरज आहे .

विजेची समस्या सुटणार कधी ?

तळणी बस स्टँड व गावात कधी दिवसभर तर कधी रात्रभर वीज पुरवठा खंडीत राहतो. वर्षानुवर्ष विजेची समस्या कायम असून १२ -१२ तास वीज पुरवठा खंडीत असतो. महावितरणच्या कारभाराबद्दल वारंवार तक्रारीनंतर वरिष्ठांकडून दखल घेतली जात नसून विजेची समस्या सुटणार कधी ? असाही प्रश्न व्यापाऱ्यांकडून उघडपणे विचारला जात आहे.

याबाबत महावितरणचे कनिष्ठ अभियंता ए एम जंगम यांना विचारले असता, रोहीत्र जळाल्याने बस स्टॅन्ड भागात दिवसभर व रात्रभर वीज पुरवठा खंडीत आहे. आज दिवसभरात रोहीत्र बदलून दिले जाईल , त्यानंतरच विजपूरवठा सुरळीत होईल, असे जंगम म्हणाले.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!