कुंभार पिंपळगाव ते गुंज रस्त्याचे डांबरिकरण निकृष्ट दर्जाचे; अधिकाऱ्यांचे कंत्राटराला पाठबळ
प्रतिनिधी/जालना
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव ते गुंज ह्या ८ कि.मी.रस्त्याचे काम निकृष्ट केले जात असून सदरील कामाची उच्चस्तरीय पातळीवर चौकशी करण्यात यावी अशी गावकऱ्यातुन मागणी होत आहे.
कुंभार पिंपळगाव ते गुंज अशा ८ किमी झालेल्या रस्त्यांच्या कामांमध्ये जुना रोड न उकरता त्याच रस्त्यावर थोड्या प्रमाणात खडी व डांबर टाकून निकृष्ट दर्जाचे काम जलदगतीने चालू आहे.
एकच पावसामध्ये रस्त्याची खरी दुर्दशा होईल अशी गावकऱ्यांनी म्हणणे आहे .
हे रस्त्याचे काम दोन कंत्राटदारांनी घेतले असून रस्त्याचे बोगस पणे काम चालू आहे. काळी जमीन असल्यामुळे रस्तावर पाणी न टाकता कोरड्या जमिनीवरच डांबर टाकून दबाई केली जात आहे.
सदरील रस्त्याची लेवल ही केली नसल्याने हा रस्ता दोन महिने तरी टिकेल का? असा प्रश्न ग्रामस्थांच्या विचारला जात आहे.कितीतरी वेळेस रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून बसची सुविधा सुद्धा बंद करण्यात आली होती.सदरील कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्यांचा वापर केला जात आहे
रस्त्याचे काम दर्जेदार करण्याची मागणी सूरज देशमुख, सुभाष जाधव, प्रताप तौर, भीमाशंकर धनवडे (माजी सरपंच, गुंज) यांनी केली आहे
उमेश काजळे (सरपंच,गुंज ||बु||)
कुंभारी पिंपळगाव ते गुंज या रस्त्याचे काम अति निकृष्ट दर्जाचे चालू आहे. गोदाकाठचा भाग असल्यामुळे ऊस वाहण्यासाठी शेतकऱ्यांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला.या रस्त्याचे काम बुटाला पॉलिश केल्यासारखेच आहे असे मत गुंज गावचे सरपंच उमेश काजळे यांनी व्यक्त केले.
कुंभार पिंपळगाव ते गुंज रस्त्याचे काम बोगस पद्धतीने चालू आहे. निकृष्ट दर्जाचे खडी व डांबर टाकून रस्त्याचे काम चालू आहे.पुढे काम चालू असलेला रस्ता मागे उखळत जात आहे
भा.ज.पा.जि. सरचिटणीस यांना प्रताप तौर
याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता एस.भारती यांना संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.