जालना जिल्हा
नगरपंचायत व ग्रामपंचायत निवडणुक क्षेत्रात मद्यविक्री बंद;जिल्हाधिकारी यांचे आदेश
जालना, दि. 18:- जालना जिल्ह्यातील बदनापुर, जाफ्राबाद, मंठा, घनसावंगी, तीर्थपुरी या 5 नगरपंचायतीच्या तसेच परतुर तालुक्यातील खांडवीवाडी व घनसावंगी तालुक्यातील देवी दहेगांव या 2 ग्रामपंचायतीच्या निवडणुका कालावधीत शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत ठेवण्यासाठी जिल्ह्यातील वरील 5 नगरपंचायती व 2 ग्रामपंचायती क्षेत्रातील सर्व ठोक व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्यांचे व्यवहार मतदानाच्या दिवशी म्हणजे दि. 18 जानेवारी 2022 रोजी संपूर्ण दिवस व मतमोजणीच्या दिवशी म्हणजे दि. 19 जानेवारी 2022 रोजी मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणी संपेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत.