जालना जिल्हा
अन…शंभर नारळ फाेडून सरपंचांनी केली नवसपुर्ती
न्यूज जालना| प्रतिनिधी
राज्यात काेराेनाच्या तिसऱ्या लाटेने पुन्हा जोर धरला आहे. यातच काही दिवसापूर्वी केंद्रीय राज्यंमत्री रावसाहेब दानवे यांना काेराेनाची लागण झाली हाेती. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले हाेते.
या आजारातून लवकर बरे हाेण्यासाठी अनेकांनी पुजा, प्रार्थना केली हाेती. केंद्रीय राज्यंमत्री दानवे काेराेनामुक्त हाेऊन सुखरूप घरी यावे, यासाठी राजूर येथील सरपंच तथा गणपती संस्थानचे विश्वस्त भाऊसाहेब भुजंग यांनी नारळ फाेडण्याचा राजुरेश्वरास नवस केला हाेता.
केंद्रीय राज्यंमत्री रावसाहेब दानवे बरे हाेऊन परतल्यानंतर राजुरेश्वराचे दर्शन घेतले. तर सरपंच भाऊसाहेब भुजंग यांनी शंभर नारळ फाेडून नवस पूर्ण केला आहे. नारळ फाेडण्याचा शुभारंभ केंद्रीय राज्यंमत्री दानवे यांच्या हस्ते करण्यात आला आहे.