महाराष्ट्र न्यूज

पहिली आणि दुसरीच्या अभ्यासक्रमाबाबत वर्षा गायकवाड यांची महत्वाची माहिती!

मुंबई /प्रतिनिधी

images (60)
images (60)


राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. वर्षा गायकवाड यांनी नाशिक येथे बोलताना येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असल्याची माहिती दिली. आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर झेडपीच्या शाळांमधून शिक्षण देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.
वर्षा गायकवाड यांनी महापुरुषांच्या नावांवरुन करण्यात येणाऱ्या वादावर देखील भाष्य केलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाववरून बाद निर्माण केला जातो, त्यामुळे मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

सीबीएसईच्या धर्तीवर अभ्यासक्रम

वर्षा गायकवाड यांनी येणाऱ्या काळात पहिली आणि दुसरीचा अभ्यासक्रम बदलला जाणार असून तो आंतरराष्ट्रीय आणि सीबीएसईच्या धर्तीवर झेडपीच्या शाळांमधून शिक्षण देणार आहे, अशी माहिती दिली.

महापुरुषांच्या इतिहासाची ओळख करुन देणार

नेताजी सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यां नावाववरून वाद निर्माण केला जातो. त्यामुळे मुलांना थोर पुरुषाच्या इतिहासाची ओळख करून दिली जाणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत. शाळांमध्ये ग्रंथोत्सव आणि शिक्षण उत्सव सुरू करणार असल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.
शालेय शिक्षण विभाग प्रत्येक घराशी सबंधित विषय आहे. शाळांमध्ये शनिवार हा पुस्तक विरहित असावा, छंद जोपासण्यासाठी वेळ देणार असल्याचं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!