टेक्नॉलॉजी

आपले रेल्वे तिकीट कन्फर्म झाले नाही, तरीही निश्चितरहा IRCTC सुरू केली ही सुविधा

बऱ्याच वेळेस रेल्वेचे तिकीट वेटिंग लिस्ट मध्ये राहते आणि कन्फर्म होत नाही , कन्फर्म न झालेल्या तिकीटाचे पैसेही लवकर रिफंड होत नाही मात्र आता यातून प्रवाश्यांची सुटका होणार आहे . आयआरसीटीसीने प्रवाश्यांच्या सुविधेसाठी आपली वेबसाईट अपग्रेड करण्याचा निर्णय घेतला आहे , तसेच आयआरसीटीसीवची पेमेंट गेट वे सेवाही सुरू होणार , यामुळे थर्ड पार्टीवर अवलंबून रहावे लागणार नाही . जाणून घ्या याविषयी सविस्तर ? वेबसाईट आणि मोबाईल अॅप वापरणाऱ्यांसाठी आयआरसीटीसी iPay अंतर्गत एक तात्काळ रिफंडसाठी फिचर आयआरसीटीसीने सुरू केले आहे .

images (60)
images (60)

याचा लाभ घेण्यासाठी युजरला आपल्या बँक खात्याची माहिती एकदाच द्यावी लागेल . तिकीट बुक करताना जी माहिती देण्यात येईल , त्याच माहितीच्या आधारे आणि त्याच बँक खात्यात तिकीट रद्द केल्यावर थेट पैसे जमा केले जातील .

• तसे याआधी तिकीट रद्द केल्यानंतर खात्यात पैसे जमा होण्यासाठी दोन ते चार दिवसांचा अवधी लागत होता , मात्र नव्या फिचरमुळे तिकीट , रद्द केल्यास काही मिनिटातच पैसे त्याच्या खात्यात जमा होतील .

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!