महाराष्ट्र न्यूज
शालेय पोषण आहारातही वाईन द्या
किराणा दुकान आणि सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीची परवानगी देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे . या निर्णयावरून विरोधक आता आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत .
या निर्णयावर बडातात्या कराडकरही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे . शालेय पोषण आहारातही आता वाईन द्या असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला आहे . ‘ शासनाला मी विनंती करतो की शासनाने आता भाजी विक्री आणि सकाळी दूध व पेपर विक्रेत्यांना घरोघरी देण्यासाठी दारूचे पाऊच दिले तर लोकांना घरोघरी दारू मिळेल ‘ असे म्हणत निशाणा साधला आहे .