जालना जिल्हा

जिल्हा न्यायालयात सुनावणीसाठी आलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जालना:

images (60)
images (60)

जावयाच्या मृत्यूप्रकरणी पारध पोलीस ठाण्यात 2017 मध्ये दाखल असलेल्या भादवि. 302 च्या गुन्ह्यात आरोपी असलेले भोकरदन तालुक्यातील धोंडखेडा येथील शेषराव कडुबा कोल्हे (वय 50) हे बुधवार सकाळी आपल्या विधवा मुलीसह पहिले जिल्हा व सत्र न्यायाधीश टिकले यांच्या न्यायालयात सुनावणीसाठी आले होते.आज सकाळी 11. 40 वाजता सुनावणीदरम्यान शेषराव कोल्हे यांना अचानक चक्कर आली व ते जमिनीवर कोसळले.

त्यावेळी न्यायालयीन कर्मचारी आणि पोलिसांनी तातडीने कोल्हे यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरू असताना त्यांचा जिल्हा रुग्णालयात काही वेळातच मृत्यू झाला. मयत शेषराव कोल्हे यांची मुलगी अरुणा घनघाव यांनी दिलेल्या माहितीवरून तालुका जालना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक सुरेश खाडे हे अधिक तपास करीत आहेत.जिल्हा सरकारी रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी सुरू आहे.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!