जालना जिल्हा

जालना:वखार आपल्या दारी, वखार महामंडळाचे वचन शेतमालाचे संरक्षण अभियान संपन्न

     जालना दि. 2:-  महाराष्ट्र  राज्य  वखार  महामंडळ, कृषि विभाग व  महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाद्वारे  अभियान अंतर्गत शेतमाल तारण योजनेची शेतक-यांना माहिती मिळावी या करीता दि. 31 जानेवारी 2022 रोजी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या जालना भोकरदन रोड वखार केंद्रावर ता. जालना येथे एक दिवसीय संपन्न झाली.

images (60)
images (60)

    कार्यशाळेस वखार महामंडळाचे उप महाव्यवस्थापक औरंगाबाद आर. एस. भिसे, विशेष कार्य अधिकारी म.ऊ. सुर्यवंशी, भाऊसाहेब टेमगर माजी विभाग प्रमुख, (सहकार विकास महामंडळाच्या गोदाम व्यवस्थापनाचे वरिष्ठ सल्लागार), व्यापार व्यवस्थापक सहकार विकास महामंडळ कुशाग्र मुंगी, विभागीय व्यवस्थापक सहकार विकास महामंडळ अंकुश सोनवणे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना शीतल चव्हाण, उपविभागीय कृषी अधिकारी भिमराव रणदिवे,  साठा अधिक्षक भोकरदन रोड पी.एस. पुरी, तंत्र व्यवस्थापक सुनील बोधने, शेतकरी व मोठ्या प्रमाणात  ठेवीदार शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी व विविध सहकारी संस्था यांचे प्रतिनिधी इत्यादी मार्गदर्शक उपस्थित होते.

    वखार महामंडळाच्या गोदामात शेतमाल साठवणुकीसाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत शेतक-याच्या शेतमालासाठी गोदामांमध्ये 25 टक्के जागा आरक्षित व शेतमाल साठवणुकीस प्राधान्य तसेच वखार महामंडळाने शेतक-यांसाठी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी 9 टक्के द.सा.द.शे. व्याज दरामध्ये शेतमाल तारण कर्ज योजना महाराष्ट्र राज्य सहकारी बँके मार्फत  राबविली जात आहे. शेतक-यांना शेतमाल साठवणुक भाड्यात 50 टक्के सवलत, तेसच शेतकरी उत्पादक कंपन्यासाठी 25 टक्के सवलत देण्यात येते.

     महामंडळाच्या वतीने शेतक-यांनी साठवणुक केलेल्या शेतमालाचा 100 टक्के विमा काढला जातो. शेतक-यांनी  साठवलेल्या शेतमालावर धुरीकरण, कीडप्रतिबंधक औषध फवारणी केली जाते. यासाठी कोणत्याही प्रकारचे  अतिरिक्त शुल्क आकारले जात नाही. शेतक-यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा सअे आवाहन आर.एस. भिसे यांनी केले.

वखार महामंडळा मार्फत वखार पावती पराक्राम्य लेख व ऑनलाईन सुविधा मार्फत शेतक-यांना तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांना वखार पावतीवरील मालाच्या किंमतीवर बँकेकडे तारण ठेवून वखारपावती वरील मालाच्या किमतीच्या 70 टक्के पर्यंत 9 टक्के द.सा.द.शे. व्याजदराने  24 तासाच्या आत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येते. शेतक-यांच्या शेतमालाच्या चांगला  बाजार भाव मिळवून देवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे, काही वखार केंद्रावर क्लिनिंग अँड ग्रेडिंग सुविध तसेच शेतमालाचे मुल्यवर्धन व प्रतवारी करुन अन्नधान्याची गुणवत्ता तपासण्यासाठी प्रयोगशाळा उपलब्ध आहेत. या योजनेचा जास्तीत जास्त शेतक-यांनी फायदा घ्यावा. शेतकरी बांधवांनी खरीप व रब्बी पिकांच्या सुगीच्या काळात जास्तीची आवक झाल्यामुळे शेतमालाचे बाजारभाव कमी होतात त्यामुळे सुगीच्या काळात शेतमालाची विक्री न करता शेतक-यांनी शेतमालाची वखार महामंडहात साठवणूक करुन सुविधेमार्फत कर्ज घेऊन आपली आर्थिक निकड भागवून विक्री न करता शेतक-यांनी शेतमालाची वखार महामंडहात साठवणुक करुन सुविधेमार्फत कर्ज घेऊन आपली आर्थिक निकड भागवून भविष्यात होणा-या शेतमालाच्या  दरवाढीचा फायदा घेण्याचे आवाहन विशेष कार्य अधिकारी,माजी विभाग प्रमुख  श्री सुर्यवंशी यांनी केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भिमराव रणदिवे यांनी कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

उपविभागीय कृषी अधिकारी श्रीमती शीतल चव्हाण यांनी पोकरा अंतर्गत  व कृषी विभागाच्या विविध योजनोची माहिती दिली. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या वतीने गोदाम बांधणीसाठीच्या सर्व शासकीय योजनांची माहिती भाऊसाहेब टेमगर यांनी दिली. विभागीय व्यवस्थापक महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ अंकुश सोनवणे यांनी खत निविष्ठा वितरणाबाबत माहिती दिली. व्यापार व्यवस्थापक सहकार विकास महामंडळ कुशाग्र मुंगी यांनी शेतकरी उत्पादक कंपन्याना व्यापाराबाबत मार्गदर्शन केले. साठा  अधीक्षक पी.एस. पुरी यांनी कार्यक्रमाचे आभार मानले व वखार महामंडळाच्याकेंद्रावरील कामकाजाबद्दल माहिती दिली व वखार महामंडहाच्या सोयी सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे .

 

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!