अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या अर्थसहाय्य योजनेविषयी बेबीनार

अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या अर्थसहाय्य योजनेविषयी 9 फेब्रुवारी 2022 रोजी मोफत वेबीनार
जालना दि. 7 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने जालना व औरंगबाद जिल्ह्यातील युवक-युवतींना आणि शेतक-यांना स्वयंरोजगार करण्याबाबत उद्योजकता जाणीव, प्रेरणा व मार्गदर्शन होण्यासाठी “चला उद्योजक होऊ या!” या शृंखलेअंतर्गत “अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या अर्थसहाय्य योजना” या विषयावर मोफत ऑनलाईन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 9 फेब्रुवारी 2022 बुधवार रोजी दुपारी 4.00 वाजता करण्यात आले आहे. कार्यक्रम कार्यालयाच्या https://www.facebook.com/JalnaSkillDevelopment या फेसबुक पेजवरून थेट ऑनलाईन प्रक्षेपित करण्यात येणार असुन यामध्ये अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळ यांचे विभागीय समन्वयक, प्रवीण आगवान, आणि जिल्हा समन्वयक,उमेश कोल्हे,जालना व संपत चाटे,सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना हे मार्गदर्शक ह्या वेबीनारद्वारे मार्गदर्शन करणार आहेत. .
वरील कार्यक्रम या कार्यालयाचे अधिकृत फेसबूक पेज https://www.facebook.com/ JalnaSkillDevelopment व https://www.facebook.com/AurangabadSkillDevelopment वर थेट लाईव्ह प्रक्षेपित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होणा-या युवक युवतीना, स्वयंरोजगार करण्यासाठी अण्णासाहेब पाटील अर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजना विषयी माहिती देणार आहेत.
वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना या योजनासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा,योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे,महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्रता अटी व शर्ती याबाबत तज्ञाकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या अनुषंगाने सहभागी उमेदवारांना फेसबूक पेजवर कमेंट बॉक्स मध्ये आपले प्रश्न विचारता येतील. याची उत्तरे कार्यक्रमाच्या शेवटी देण्यात येतील. या मार्गदर्शनाचा लाईव्ह लाभ घेण्यासाठी स्वयंरोजगार ईच्छूक युवक-युवतीं यांनी या कार्यालयाच्या JalnaSkillDevelopment या फेसबूक पेजला फॉलो करावे आणि लाईव्ह सहभागी व्हावे. या मध्ये काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी 02482-299033 अथवा jalnarojgar@gmail.com या ई- मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास ,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना,औरंगबाद यांनी सांगितले आहे.