जालन्याच्या रुग्णालयातून चोरी गेलेले बाळाचा पोलिसांनी लावला छडा ! बाळ सुखरूप आईला स्वाधीन
जालना, दि. 8 – जिल्हा महिला व बाल रुग्णालयातून पळवून नेलेले बालक आरोपी महिलेसह पोलिसांनी ताब्यात घेतले. स्थानिक गुन्हे शाखेच्या दमदार कार्यवाहीमुळे बालक मातेच्या कुशीत सुखरुप पोहोचले. आरोपी महिलेने जालना रेल्वेस्टेशनवरून परभणी व तेथून सेलूत पलायन केले होते. मात्र, पोलिसांनी तिचा माग काढत अखेर त्या महिला आरोपीचा मनसुबा उधळून लावला यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 07/02/2022 रोजी सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान जिल्हा महिला व बाल रुग्णालय येथे एका महिलेची प्रसृती झाली. तिच्या शेजारी असलेल्या एक बाईने प्रसृती झालेल्या बाईशी ओळख करून विश्वास संपादन केला. त्यानंतर बाळाला उन्हात बाहेर घेऊन जाते असे म्हणून एक दिवसाच्या बालकास पळवून नेले होते.
त्यावरुन पोलीस ठाणे कदीम जालना येथे गुरनं 44/2022 कलम 363 भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल आहे. घटनास्थळी स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व अंमलदार यांनी भेट देऊन बालकास पळून नेलेल्या महिलेच्या अनुषंगाने माहिती घेतली.संपूर्ण शहरामध्ये शोध घेत असताना तांत्रीक विश्लेषणा दरम्यान एक महिला ही जालना रेल्वे स्टेशनवरून परभणीकडे जाणा-या रेल्वेने गेल्याची माहिती मिळाली. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेतील पथकाने सी.सी.टी.व्ही . तपासले परिसरातील नागरिक यांच्याकडून सदर महिलेबाबत माहिती घेतली असता सदर महिला ही परभणीकडे जाणार असल्याचे समजले. त्यावरुन जालना स्थानाकावरुन परभणीकडे जाणा-या सर्व रेल्वेची माहिती घेतली.
त्यानंतर सदर पथक परभणी रेल्वे स्टेशनवर आठ वाजता पोहचले. तेथील सर्व सी.सी.टी.व्ही फुटेजचे विश्लेषण करून एक संशयित महिला ही रेल्वे स्टेशनच्या बाहेर बालकासह रिक्षामध्ये जाताना दिसून आली. त्यावरुन सदर पथकाने संबंधित रिक्षाचालक यास विचारपूस केली. सदर महिलेस कोठे सोडण्यात आले. याबाबत माहिती घेतली असता रिक्षा चालकाने संशयित महिलेस सामान्य रुग्णालय, परभणी येथील रोडवर सोडल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने सामान्य रुग्णालय, परभणी येथील रुग्णांना व रुग्णालयातील स्टाफ कर्मचारी यांना सदर संशयित महिलेबाबत विचारपूस केली. सदर महिला ही सायंकाळी पाच वाजेपर्यंत हॉस्पिटल परिसरातील झाडाखाली बसलेली असल्याचे समजले.तेव्हा तेथील काही कर्मचारी यांच्याकडुन माहिती मिळाली की, सदर महिलेने एका व्यक्तीच्या मोबाईलवरून तिच्या नातेवाईकास फोन लावून त्यास बोलावुन घेतले होते. सामान्य रुग्णालयात तिची व बालकाची नोंद घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिचा हा प्रयत्न अयशस्वी झाला व ती तेथून निघून गेली होती. त्यावरुन सदर पथकाने रुग्णालयात तांत्रीक तपास करून सदर महिला ही सेलू येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न करून तात्काळ सेलू येथील गायत्रीनगर भागात गेले. वस्तीतील जाफर शेख याच्या घरी जाऊन पाहणी केली असता एक महिला बालकासह मिळून आली.
सदर महिलेकडे जवळ असलेल्या बालकाच्या संबंधाने विचारपुस केली असता तिने काही एक माहिती सांगितली नाही. जालना रुग्णालयातील असलेल्या बालकाच्या तळपायावरील निळया शिक्यांची पाहणी केली त्यावरुन सदर बालक हे जिल्हा रुग्णालयातील पळवुन नेल्याचे निष्पन झाले.सदर महिलेस विश्वासात घेऊन विचारपुस करता तिने गुन्हा केल्याचे सांगितले आहे. दिनांक 08/02/2022 रोजी सदर नेलेल्या बालकास त्याच्या आईकडे सुखरुप देण्यात आले सदर संशयित महिला आरोपीस पुढील कार्यवाही कामी पोलीस ठाणे कदीम जालना येथे हजर करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, दुर्गेश राजपुत, पोउपनि , अंमलदार सॅम्युअल कांबळे , विनोद गडदे , सचिन चौधरी , सागर बाविस्कर , दत्तात्रय वाघुंडे , सुधिर वाघमारे , कैलास चेके , योगेश सहाने , चालक रमेश पैठणे महिला अंमलदार चंदक्रला शडमल्लु , गोदावरी सरोदे यांनी केली